हिंगणघाट तालुक्यात कोविड लसीची कमतरता, न. पा. नगरसेवीकेचे निवेदन.
हिंगणघाट तालुक्यात कोविड लसीची कमतरता, न. पा. नगरसेवीकेचे निवेदन.

हिंगणघाट तालुक्यात कोविड लसीची कमतरता, न. पा. नगरसेवीकेचे निवेदन.

✒मुकेश चौधरी, विदर्भ ब्यूरो चीफ़✒
हिंगणघाट,दि.21 एप्रिल:- वर्धा जिल्हात मोठ्या प्रमाणावर कोरोना वायरसचे रुप विक्राळ होत असल्याचे समोर येत आहे. त्यांत हिंगणघाट तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोना वायरस बाधीत रुग्ण समोर येत असल्याने आणि आरोग्य व्यवस्था कुठे तरी कमी पडत असल्याने लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाल आहे.

म्हणून दि. 20 रोजी हिंगणघाट नगरपालिकेच्या नगरसेविका सौ. शुभांगी सुनिल डोंगरे यांनी शहरातील कोरोना रूग्ण बघता हिंगणघाट शहराला कोवीड लस लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी या करिता वर्धा जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांना हिंगणघाट उपविभागीय अधिकारी खंडाईत यांच्या मार्फत निवेदन दिले.

या निवेदनात प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात हिंगणघाट शहरातील कोविड रूग्ण लक्षात घेता मागील आठवड्याभरात कोणीतीही कोविड लस ऊपलब्ध झाली नाही. म्हणून मोठ्या प्रमाणात रूग्णांना हाल सोसावे लागत आहे. हि बाब प्रामुख्याने पत्रात नमूद केली तरी वर्धा जिल्हाधिकारी यांनी जातीने लक्ष देवुन हिंगणघाट शहराला जास्तीत जास्त कोविड लस उपलब्ध करून देण्यात यावे ही मागणी करण्यात आली. प्रतिलिपी पालकमंत्री वर्धा जिल्हा तसेच हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचे आमदार समीरभाऊ कुणावार यांना देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here