वसई विरार मध्ये आजही अत्यावश्यक आरोग्यसुविधांची कमतरता
वसई विरार मध्ये आजही अत्यावश्यक आरोग्यसुविधांची कमतरता

वसई विरार मध्ये आजही अत्यावश्यक आरोग्यसुविधांची कमतरता

वसई विरार मध्ये आजही अत्यावश्यक आरोग्यसुविधांची कमतरता
वसई विरार मध्ये आजही अत्यावश्यक आरोग्यसुविधांची कमतरता

मनोज कांबळे

नालासोपारा. दि. २१ एप्रिल:-  मुंबई शहराप्रमाणे वसई विरारमध्ये हि कोरोनाची दुसरी लाट तीव्रपणे पसरली असून कोरोना संसर्गाचे प्रमाण एकूण चाचण्यांच्या ५०% – ६०% पर्यंत पोहचले आहे. गेल्या आठवड्यामध्ये वसई विरार मधील दररोजची सरासरी रुग्णसंख्या साडेसहाशेच्या घरात पोहचत असल्याने आधीच अपुऱ्या असलेल्या आरोग्यसेवांवर अतिरिक्त ताण पडत आहे. बारा एप्रिलला ऑक्सिजनचा साठा संपल्याने नालासोपाऱ्यातील विनायक आणि रिद्धीविनायक हॉस्पिटलमध्ये दहा रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर शहरातील कमकुवत अत्यावश्यक आरोग्यव्यवस्थेची परिस्थिती जनसामान्यांसमोर आली होती. या घटनेला आठवडा उलटून गेला असला तरीही  त्या परिस्थितीमध्ये फारसा फरक पडलेला आढळून आलेला दिसत नाही .

आजच्या घडीला वसई-विरार आणि पालघर जिल्ह्यामध्ये ३४२ ऑक्सिजन बेडपैकी केवळ ३ बेड रुग्णांसाठी उपलब्ध आहेत. तसेच अतिगंभीर रुग्णांसाठी लागणाऱ्या ३६ आयसीयू आणि ६९ व्हेंटीलेटर्स बेडपैकी एकही बेड रुग्णांसाठी रिक्त नसल्याने शहरातील रुग्णांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी आयसीयू, व्हेंटीलेटर्स आणि ऑक्सिजनचा पुरवठा तातडीने वाढवण्याची गरज आहे.

या संदर्भात बोलताना पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादासाहेब भुसे यांनी वसई विरार मध्ये ७८ लाखांचा ऑक्सिजन प्लांट लवकरच सुरु करण्याची घोषणा केली होती. स्थानिक आमदार हितेंद्र ठाकूर यांनी ट्विटरवरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे वसई-विरार शहरातील अपुऱ्या ऑक्सिजन पुरवठ्याबद्दल तक्रार केली होती. मात्र या एकूण परिस्थितीवर वसई-विरार शहरातील  जनतेमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. दुर्देवी घटना घडून गेल्यानंतर योजनांच्या घोषणा करण्याऐवजी संभाव्य परिस्थितीचा अंदाज घेऊन अगोदरच अत्यावश्यक आरोग्यसेवांमध्ये वाढ करण्याची मागणी शहरातील नागरिक प्रशासनाकडे करत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here