यूपी, बिहारमध्ये भाजपचा पराभव निश्चित

52

लखनऊ/पाटणा: संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेश व बिहारमधील लोकसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी अंतिम टप्प्यात असून आतापर्यंत हाती आलेल्या मतांच्या आकड्यांनुसार भाजप पराभवाच्या छायेत आहे. यूपीतील गोरखपूर व फुलपूर मतदारसंघात समाजवादी पक्षानं भाजपच्या उमेदवारांना मोठ्या फरकानं मागे टाकलं असून बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलानं मोठी आघाडी घेत भाजपला दणका दिला आहे. बिहारमधील विधानसभेच्या एक जागाही राजदनं जवळपास राखली आहे.