हिंगणघाट आमदार निधीतुन 10 किलोलिटरचा लिक्विड ऑक्सिजन प्लॅन्ट उभारणार.
हिंगणघाट आमदार निधीतुन 10 किलोलिटरचा लिक्विड ऑक्सिजन प्लॅन्ट उभारणार.
हिंगणघाट आमदार निधीतुन 10 किलोलिटरचा लिक्विड ऑक्सिजन प्लॅन्ट उभारणार.
हिंगणघाट आमदार निधीतुन 10 किलोलिटरचा लिक्विड ऑक्सिजन प्लॅन्ट उभारणार.
हिंगणघाट आमदार निधीतुन 10 किलोलिटरचा लिक्विड ऑक्सिजन प्लॅन्ट उभारणार.
️आशीष अंबादे ️, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
हिंगणघाट:- वर्धा जिल्हातील हिंगणघाट तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाढत असलेल्या कोरोना वायरसमुळे विधानसभा क्षेत्राचे आमदार समीरभाऊ कुणावार यांचा आमदार निधीतुन कोव्हीड – 19 अंतर्गत हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये सुमारे 150 बेडला पुरेल इतका 10 किलोलिटरचा लिक्विड ऑक्सिजन प्लॅन्ट उभारण्याच्या सुचना दिल्या असून 50 बेडला सेन्ट्रल ऑक्सिजन सिस्टिम लावण्याचीसुद्धा सुचना जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांचेमार्फत केली आहे. यासाठी लागणारा निधी आमदार समिरभाऊ कुणावार यांच्या आमदार निधीतुन खर्च करण्यात यावा. असेही यावेळी सांगण्यात आले.
कोविड महामारीची तीव्रता लक्षात घेता 15 ते 20 दिवसामध्ये हा प्रकल्प तयार करण्यात यावा अशी मागणी आमदार समीरभाऊ कुणावार यांनी वर्धा जिल्हाधिकाऱ्यांकड़े स्वतः केली आहे. हिंगणघाट हा मोठा तालुका आहे, येथील लोकसंख्या पाहता उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णासांठी 50 नविन बेड तसेच त्यासाठी लागणारे साहित्य तातडीने खरेदी करण्याची गरज असून 10 ऑक्सिजन कॉन्सट्रेटर सिस्टिम उपलब्ध करुन देणेसुद्धा महत्वाचे आहे. छोटे (सेमी) व्हेटिलेटर 5 नग देण्यात यावे. त्याचप्रमाणे कोव्हीड रुग्णासाठी आवश्यक असणारा औषधी आणि इन्जेक्शनचा साठा 2 महिना पुरेल इतका आमदार निधी मधुन घेण्याची परवानगीसुद्धा आमदार समीरभाऊ कुणावार यांनी पत्राद्वारे प्रशासनाला दिली.
आज दि.21 रोजी यासंदर्भात आमदार समीरभाऊ कुणावार यांनी जिल्हाधिकारी यांनी तातडीने निर्णय घेऊन सुविधा पुरविण्यात याव्या,अशी मागणी केली, जेणेकरुन कोरोनाबाधित रुग्णाचा जिव वाचवता येईल. तसेच उपजिल्हा रुग्णालयातील कोरोना योध्याना रुग्णसेवेचे काम करण्यास बाधा येणार नाही. उपरोक्त आरोग्य सुविधा तात्काळ आमदार निधी मधून मंजूर करण्यात यावा आणि माझ्या स्थानीक आमदार निधी मधून देण्यात यावा अशी आग्रही मागणी आमदार समीरभाऊ कुणावार यांनी पत्रा द्वारे केली..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here