कदाचित ही माझे शेवटचे गुड मॉर्निंग असेल. म्हणत डॉ. मनिषा जाधव यांच कोरोना ने निधन.

55

नीलम खरात, मुंबई प्रतिनिधी
मुंबई,दि.22एप्रिल:- आज महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कोरोना वायरस प्रक्रोप वाढत आहे. अनेक लोकांना आपल्या कवेत घेत आहे. त्यात डॉक्टर पण सूटले नाही. मुंबईतुन एक धक्कादायक आणि समाजमन हेलावणारी घटना घडली आहे.

डॉ. मनिषा जाधव यांचे कोरोनाने निधन झाले असल्याची बातमी समोर आली आहे. त्या शिवडी येथे क्षयरोग रुग्णालयात मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत होत्या. डॉ. मनिषा जाधव यांनी त्यांच्या मृत्यूआधी एक सोशल मिडीयावर पोस्ट लिहिली होती. आता त्यांची ती पोस्ट सर्वीकडे सोशल मीडियावर व्हायरल झाली. डॉ. मनीषा जाधव यांना त्यांच्या मृत्यूची कल्पना आली होती काय? त्यांनी लिहलेल्या आपल्या पोस्टमध्ये काय लिहलेय? बघुया.

डॉ. मनिषा जाधव शिवडीतील क्षयरोग रुग्णालयात मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. सोमवारी रात्री मुंबईतील बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात वयाच्या 51 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर डॉ. मनीषा जाधव यांना त्यांच्या मृत्यूची कल्पना आली होती काय? असा प्रश्न सोशल मीडियावर विचारला जात आहे.

मृतक डॉ. मनीषा जाधव यांनी काय म्हटलं होतं आपल्या पोस्ट मध्ये? 
‘कदाचित ही माझे शेवटचे गुड मॉर्निंग असेल. कदाचित तुम्हाला या ठिकाणी मी पुन्हा भेटू शकणार नाही. सर्वांनी काळजी घ्या. शरीर मृत पावते आत्मा नाही, आत्मा अमर आहे.’

कदाचित ही माझे शेवटचे गुड मॉर्निंग असेल. म्हणत डॉ. मनिषा जाधव यांच कोरोना ने निधन.

ही पोस्ट लिहिल्यानंतर 36 तासांनी त्यांचा मृत्यू झाला. अनेकांनी कमेंट बॉक्सच्या माध्यमातून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. तशा पोस्टही नेटकऱ्यांनी लिहिल्या. काही जण म्हणाले होते की, ‘काळजी करू नका, आपण लवकर बऱ्या व्हाल, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, काहीही होणार नाही.’ पण, त्यांचे निधन झाल्यानंतर सर्वीकडे हळहळ व्यक्त होत आहे.