जळगाव संजय गांधी निराधार योजनेत लिपीकाने केला लाखोचा भष्ट्राचार.

53

जळगाव संजय गांधी निराधार योजनेत लिपीकाने केला लाखोचा भष्ट्राचार.

लिपीकाने केली कमाल, बायकोचा नावे जमा केले संजय गांधी निराधार योजनेचे लाखो रुपये.

 

जळगाव संजय गांधी निराधार योजनेत लिपीकाने केला लाखोचा भष्ट्राचार.
जळगाव संजय गांधी निराधार योजनेत लिपीकाने केला लाखोचा भष्ट्राचार.

✒विशाल सुरवाडे, जळगाव जिल्हा प्रतिनिधी✒
जळगाव:- येथील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गरीब वृद्ध लोकांचा टाळूवरच लोणी खाण्याचा प्रकार समोर आला आहे. वृध्द निराधार लोकांना शासना मार्फत देण्यात संजय गांधी निराधार योजनेचा निधी मध्ये मोठ्या प्रमाणात भष्ट्राचार करण्यात आल्याचे बातमी जळगाव येथून समोर आले आहे.

जळगाव येथील रेल्वे स्थानक जवळ असलेल्या संजय गांधी योजना विभागातील सहाय्यक लिपिकाने बनावट कागदपत्रांच्या आधारे पत्नी व शालकाच्या बँक खात्यात परस्पर 13 लाख 90 हजार रूपये वर्ग करून शासनाची फसवणूक आणि भष्ट्राचार केला आहे. या प्रकरणी लिपिकासह त्याची पत्नी व शलाकाविरुद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

संजय गांधी योजना ‘अ’ वर्ग नगरपालिका क्षेत्र कार्यालयातील सहाय्यक लिपिक संदीप प्रल्हाद शिरसाठ रा. ओम साईरामनगर, वाघनगर याने बनावट कागदपत्राच्या आधारे पत्नी सोनल शिरसाठ आणि स्वत:च्या खात्यात नोव्हेबर ते डिसेंबर 2020 या दोन महिन्यांच्या योजनेचे बिल अनुक्रमे 20 हजार आणि 40 हजार रुपये वर्ग करून घेतले. नंतर जानेवारी ते मार्च 2021 च्या योजनांच्या बिलांमध्येही फेरफार करून पत्नी सोनल शिरसाठ आणि शालक संदीप अशोक भालेराव यांच्या खात्यात 13 लाख 50 हजार रुपये वर्ग व्हावे, यासाठी दोघांचे खाते क्रमांक दिले होते. बँकेकडून पैसे वळते होताना संगणकात हा सर्व प्रकार समोर आल्याने चौकशी सुरू झाली.

एकसमान खाते क्रमांकाने भष्ट्राचार उघडकीस.
लिपिक संदीप शिरसाठ याने गेल्या वेळस पत्नी व स्वतःच्या नावे 60 हजार वळते करून घेतल्याने त्याची हिंमत वाढली. परिणामी, त्याने मोठी रक्कम लाटण्यासाठी पत्नी सेानल व तिचा भाऊ संदीप भालेराव यांचे खाते क्रमांक दिले होते. मात्र, 13 लाख 50 हजार रुपयांची रक्कम वर्ग करताना बँकेला एकच खाते क्रमांक वारंवार येत असल्याचे लक्षात आले. नंतर बँकेने थेट संजय गांधी योजनेचे तहसीलदारांना पत्र कळवून दोन नावे वेगवेगळी आणि खाते क्रमांक एकच असल्याचे कळविले.

तहसीलदारांनी मुळ लाभार्थ्यांची कागदपत्रे तपासणी केल्यानंतर दिलेले खाते क्रमांक आणि लाभार्थ्यांची खाते यात तफावत आढळून आली. प्राप्त दस्तऐवजावरून संबंधित लिपिक आणि रक्कम वळती होणाऱ्यांचे परस्पर संबध उघड होऊन सहाय्यक लिपिक शिरसाठ याने शासनाची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले. याबाबत अनिल पठाडे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात सहाय्यक लिपिक संदीप शिरसाठ, सोनल संदीप शिरसाठ आणि संदीप अशोक भालेराव या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक चंद्रकांत पाटील तपास करीत आहे.