उपजिल्हा रुग्णालयात 200 बेड्सची मंजुरी न मिळाल्यास रुग्णमित्र करणार छतावर उपोषण !
उपजिल्हा रुग्णालयात 200 बेड्सची मंजुरी न मिळाल्यास रुग्णमित्र करणार छतावर उपोषण !

उपजिल्हा रुग्णालयात 200 बेड्सची मंजुरी न मिळाल्यास रुग्णमित्र करणार छतावर उपोषण !

 If 200 beds are not sanctioned in the sub-district hospital, patient friends will go on hunger strike on the roof!

उपजिल्हा रुग्णालयात 200 बेड्सची मंजुरी न मिळाल्यास रुग्णमित्र करणार छतावर उपोषण !

 ✒ प्रशांत जगताप, प्रतिनिधी ✒
हिंगणघाट:- येथील उपजिल्हा रुग्णालयात आक्सिजनच्या सोयीसह 200 बेड्सची व्यवस्था न झाल्यास येत्या सोमवार,दि.२६ एप्रिलला प्रहारचे विदर्भ विभाग प्रमुख रुग्णमित्र गजुभाऊ कुबडे हे आपल्या स्वतःच्या घरावरील छतावर 12 तासाचे लाक्षणिक उपोषण करणार असल्याचे त्यांनी जिल्हाधिकारी वर्धा यांना आज दि 22 एप्रिलला पाठविलेल्या निवेदनातून म्हंटले आहे.

येथील उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्याना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हिंगणघाट शहर, ग्रामीण भाग व समुद्रपूर तालुका येथे दिवसेंदिवस कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे.येथील व्यवस्था अपुरी असल्यामुळे अनेक रुग्णांना बाहेरगावी उपचारासाठी जावे लागत आहे.त्यामुळे मानसिक दृष्टीने खचलेल्या रूग्णांवर आर्थिक बोझा पडत असून शारीरिक त्रासही त्याला व त्याच्या कुटुंबियांना होत आहे. ही सर्व परिस्थिती पाहता येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीत आक्सिजनच्या व्यवस्थेसह 200 बेड्सची व्यवस्था केली तर या भागातील गोरगरीब रुग्णांना येथेच उपचार घेता येईल व त्यामुळे सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळेलच सोबत सावंगी, व सेवाग्राम येथील दवाखान्यांवर पडणारा ताणही हलका होईल. या संपूर्ण बाबीचा विचार करून प्रशासकीय अधिकाऱ्यांनी वेळीच हालचाल करून या रुग्णालयात 200 बेड्सची व्यवस्था करावी ही मागणी मान्य न झाल्यास स्वतः रुग्णमित्र गजू कुबडे हे 26 एप्रिलला स्वतःच्या घराच्या छतावर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार असल्याचे निवेदनातून प्रशासनाला इशारा दिलेला आहे.त्यानंतरही मागणी मान्य न झाल्यास प्रहार स्टाईलने तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here