अखेर प्रशासनाने दिली परवानगी, कोरोना रुग्णांसाठी  देवदूतासारके धाऊन आले शिंदे.
अखेर प्रशासनाने दिली परवानगी, कोरोना रुग्णांसाठी  देवदूतासारके धाऊन आले शिंदे.
अखेर प्रशासनाने दिली परवानगी, कोरोना रुग्णांसाठी  देवदूतासारके धाऊन आले शिंदे.
शिंदे परिवाराकडून जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना राहण्याची व जेवणाची व्यवस्था करणार.
अखेर प्रशासनाने दिली परवानगी, कोरोना रुग्णांसाठी  देवदूतासारके धाऊन आले शिंदे.
अखेर प्रशासनाने दिली परवानगी, कोरोना रुग्णांसाठी  देवदूतासारके धाऊन आले शिंदे.
त्रिशा राऊत, चिमूर तालुका प्रतिनिधी
चिमूर (भद्रावती):- आपल्या अवतीभवती अनेक कोट्याधीश व लखपती आपण बघत असतो पण आपल्या उत्पनातून काही पैसे समाजकार्यात लावणारे आणि गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणारे लाखांत कदाचित एखादा व्यक्ती निघतो पण हा एखादा व्यक्ती जर आपल्या निस्वार्थ भावनेचा परिचय देत जर शेकडो लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करीत असेल तर तो देवदूतापेक्षा कमी नसतो, अगदी अशाच देवदूत रवींद्र शिंदे यांच्या माध्यमातून कोविड रुग्णांच्या मदतीला धावून आलाय आणि स्वतःचे मंगल कार्यालय, आपल्या डॉ शिंदे बंधूच्या आरोग्य सेवा इतकेच नव्हे तर 10 ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर मशीनचा आर्डर त्यापैकी 2 मशीन लवकरच उपलब्ध होणार आणि कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना जेवण शिवाय सैनिटायझर मशीन सुद्धा उपलब्ध करून दिल्या.खरं तर रवींद्र शिंदे यांनी  त्या लोकांसमोर आदर्श निर्माण केला ज्यांनी स्वतःहून ह्या सुविधा कोरोनाच्या संकट काळात जनतेला उपलब्ध करून द्यायला हव्या होत्या.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैँकेचे संचालक रवींद्र शिंदे यांनी जेंव्हा कोरोना रुग्णांची विदारक परिस्थिती बघितली आणि त्यांनी निर्णय केला की कोरोनाच्या या संकट काळात आपण समाजाला काहीतरी दिल पाहिजे आणि त्यांनी लगेच जिल्हाधिकारी यांना आवाहन केले की आपण जिल्हाच्या तालुका स्तरांवर डॉक्टर सह आरोग्य सेवा द्या मी त्या कोरोना रुग्णांसाठी जेवणाची व्यवस्था करतो ज्यामुळे ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांसाठी मोठी मदत होईल. आणि लागलीच त्यांनी तसे पत्र जिल्ह्यातील आमदार खासदार पालकमंत्री व जिल्हाधिकारी यासह जिल्हा आरोग्य अधिकारी यांना देऊन त्वरित उपाययोजना करण्याची विनंती केली आणि काय आश्चर्य? लागलीच उपविभागीय सुभाष शिंदे यांनी संपर्क साधला आणि भद्रावती तहसीलदार यांना शिंदे मंगल कार्यालय बघून तिथे काय व्यवस्था होते त्याचा आढावा घेण्याचा आदेश केला आणि अगदी दोन दिवसात शिंदे मंगल कार्यालयात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी कोविड सेंटर उभे राहिले. 
 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here