कोरोना बाधितांना योग्य आरोग्य सुविधा दया: खासदार अशोक नेते यांचे निर्देश.
कोरोना बाधितांना योग्य आरोग्य सुविधा दया: खासदार अशोक नेते यांचे निर्देश.
कोरोना बाधितांना योग्य आरोग्य सुविधा दया: खासदार अशोक नेते यांचे निर्देश.
ब्रम्हपुरी येथे कोविड स्थितीसंदर्भात आढावा बैठक
कोरोना बाधितांना योग्य आरोग्य सुविधा दया: खासदार अशोक नेते यांचे निर्देश.
कोरोना बाधितांना योग्य आरोग्य सुविधा दया: खासदार अशोक नेते यांचे निर्देश.
अमोल माकोडे ब्रम्हपुरी प्रतिनिधी
ब्रम्हपुरी,दि.22 एप्रिल:- ब्रम्हपुरी तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असून आजपर्यंत 53 कोरोना बाधितांना आपले प्राण गमवावे लागले आहे तर सद्यस्थितीत 1000 च्या वर बाधित आहेत त्यामुळे अजून बाधितांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे यावर नियंत्रण ठेवण्यासाठी व कोरोना बाधितांना त्वरीत योग्य उपचार देऊन त्यांना बरे करण्यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी दक्षता घेऊन उपाययोजना करावी तसेच अतिरिक्त बेडची व्यवस्था करून  ऑक्सिजन सिलेंडर ची मागणी करण्याचे निर्देश गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी दिले.
 शासकीय विश्रामगृह, ब्रम्हपुरी येथे आयोजित कोविड स्थिती संदर्भातील अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. आढावा बैठकीला प्रामुख्याने ब्रम्हपुरी विधानसभाचे माजी आमदार प्रा. अतुलभाऊ देशकर,  भाजपचे  ज्येष्ठ नेते प्रकाशजी बगमारे, माजी जिप उपाध्यक्ष तथा जिप सदस्य कृष्णाजी सहारे, नगरसेवक मनोज वठे, ब्रम्हपुरीच्या उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, तहसीलदार विजय पवार,  नगर परिषदेचे मुख्याधिकारी, बीडीओ, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक व अन्य अधिकारी, विभाग प्रमुख उपस्थित होते.
आढावा बैठकीत खासदार अशोक नेते यांनी माहिती घेतली असता,  ब्रम्हपुरी तालुका मोठा असून येथील कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे त्यामुळे येथे 200 अतिरिक्त बेडची व्यवस्था करण्यात यावी व यासाठी शासकीय वसतिगृह व शासकीय इमारती ताब्यात घेण्याचे निर्देश खासदार अशोक नेते यांनी दिले. तसेच कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून खाजगी डॉक्टराची व्यवस्था करून तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तपासणी केंद्र सुरू करण्यासाठी उपाययोजना करा तसेच 39 जम्बो ऑक्सिजन सिलेंडर  व लहान 37 असल्याने ते अत्यंत कमी आहे त्यामुळे अजून 100 वाढीव ऑक्सिजन सिलेंडर चे प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश यावेळी खासदार अशोक नेते यांनी  अधिकाऱ्यांना दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here