ब्रम्हपुरी तालुक्यात जमिनीच्या तुकड्या साठी वयोवृद्ध पुजाऱ्यावर केला प्राणघातक हल्ला.
ब्रम्हपुरी तालुक्यात जमिनीच्या तुकड्या साठी वयोवृद्ध पुजाऱ्यावर केला प्राणघातक हल्ला.

ब्रम्हपुरी तालुक्यात जमिनीच्या तुकड्या साठी वयोवृद्ध पुजाऱ्यावर केला प्राणघातक हल्ला.

वयोवृद्ध पुजाऱ्यास मारहाण, लोकभावनेचा पडला विसर
पोलिसांची भूमिका संशयास्पद- वारंवार बघ्याची भूमिका घेतल्याने वयोवृद्धाच्या आली जीवावर

ब्रम्हपुरी तालुक्यात जमिनीच्या तुकड्या साठी वयोवृद्ध पुजाऱ्यावर केला प्राणघातक हल्ला.
ब्रम्हपुरी तालुक्यात जमिनीच्या तुकड्या साठी वयोवृद्ध पुजाऱ्यावर केला प्राणघातक हल्ला.

अमोल माकोडे, ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी✒
ब्रम्हपुरी,दि23 एप्रिल:- तालुक्यातुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ब्रम्हपुरी येथील कुर्झा वार्ड विद्यानगर येथे 50-60 वर्षा पूर्वी शासनाने रीतसर गावठाण प्लॉट पाडून कुर्झा येथील गरजू लोकांना निवासी तत्वावर वाटप केले व काही प्लॉट सार्वजनिक हिताच्या दृष्टीने मंदिर, खेळाचे मैदान, सभामंडप व इतर कामासाठी आरक्षित ठेवले होते परंतु कालांतराने भ्रष्ट शासकीय यंत्रणेतील कर्मचारी व अधिकारी यांनी ते सर्व प्लॉट अक्षरा आर्थिक हिताने विकून खाल्ले, त्यामुळे 1984 मध्ये वस्तीतील लोकांनी एकत्र येऊन शिल्लक असलेल्या सर्व्हे नंबर 75 वर छोटसे श्री रामाचे मंदिर बांधले तेव्हापासून इथे या वस्तीतील भाविक आपल्या आस्थेप्रमाणे पूजा अर्चना करत आहेत. हिंदू संस्कृती प्रमाणे या मंदिराची नियमित देखभाल व पूजा अर्चना सेवानिवृत्त शिक्षक तुलारामजी चोले पुजारी म्हणून करीत आहेत.

ऐन रामनवमीच्या पर्वावर गैरर्जदार सुनील विखार व श्रीराम विखार यांनी दिनांक 20 एप्रिलला सकाळी 10 च्या सुमारास येऊन माझ्या शेताकडे जाणारा रस्ता हाच आहे, असं नेहमी प्रमाणे अविर्भावात ओरडत सुटला, आणी या अगोदरही मुर्त्यांना नुकसान करून पोलिसांन कडून अभय मिळवून असल्याने पुन्हा येऊन मुर्त्यांची तोड फोड चालू केली. पुजारी तुलारामजी चोले वय 80 वर्ष यांनी देव देवतांच्या मुर्त्याची विटंबना थांबविण्याचा प्रयन्त केला असता त्यांना सुनील विखार व श्रीराम विखार यांनी मारहान करणे चालू केले त्यामुळे आजू बाजूचे लोक धावून या विधवंसकाच्या हातून पुजाऱ्यांची सोडवणूक केली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. त्यात पुजारी श्री तुलारामजी चोले यांच्या पायाच्या मांडीचे हाड फॅक्चर झाले याची तक्रार लगेच त्याच दिवशी पुजारी तुलारामजी चोले यांनी पोलीस स्टेशनला तक्रार केली.

परंतु सुनील विखार व श्रीराम विखार यांना राजकीय पाठबळ असल्याने अजून पर्यंत पोलीस विभागाने कोणतीच कारवाई केली नाही किंवा साधा स्पॉट पंचनामा सुद्धा करण्याचे अवदार्य दाखविले नाही. त्यामुळे दादागिरी करणे, देव देवतांची विटम्बना करून धर्माचा अपमान केला व म्हाताऱ्या वयोवृद्ध पुजाऱ्यास अमानुष मारहाण करून दुखापत केली म्हणून संपूर्ण वस्तीतील महिला, पुरुष व युवक एक होऊन गुन्हेगारावर कारवाई करून अटक करावी व वस्तीतील सार्वजनिक कामासाठी मोकळे ठेवलेले प्लॉट त्वरित सार्वजनिक कामासाठी खाली करून देण्यात यावे या मागणी करिता पोलीस, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांना लेखी निवेदन करून आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here