मायक्रो फायनान्सच्या जाळ्यात यवतमाळ जिल्हातील ग्रामीण भागातील महिला.

57

मायक्रो फायनान्सच्या जाळ्यात यवतमाळ जिल्हातील ग्रामीण भागातील महिला.

मायक्रो फायनान्सच्या जाळ्यात यवतमाळ जिल्हातील ग्रामीण भागातील महिला.
मायक्रो फायनान्सच्या जाळ्यात यवतमाळ जिल्हातील ग्रामीण भागातील महिला.
साहिल महाजन, यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी 
यवतमाळ:- राळेगाव तालुक्यातील लहान मोठया गावात जणसामान्यांनी लॉकडाऊन काळात आपल्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी विविध मायक्रो फायनान्स कंपन्याकडून महिलांचे गट बनवून कर्ज दिल्या जाते आता या कर्जाच्या परतफेडिसाठी या कंपन्याकडून दबाव टाकल्या जात आहे.
सध्या देशामध्ये कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव आहेत. शासनाकडून संचारबंदी व कडक लॉकडाऊन लावण्यात आले आहे. मायक्रो फायनान्सकडून घेतलेल्या कर्जाचे हफ्ते फेडायचे कसे हा प्रश्न महिलांसमोर उभा राहिला. आहे गेल्या काही वर्षांपासून ग्रामीण भागात विविध मायक्रो फायनान्सचे जाळे गावागावातील नागरिका पर्यंत पोहचली आहे. त्यात जनसामान्य नागरिकांनी आपल्या दैनंदिन गरजा भागविन्यापासून ते छोटया मोठया उद्योग्यासाठी सहज उपलब्ध असणाऱ्या मायक्रो फायनान्सचे कर्ज घेतले आहे. पर्यंत कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लावले आहे व सण समारंभ सामाजिक कार्यक्रम लग्न समारंभावर निर्बंध घातले. पर्यायाने याचा प्रभाव ग्रामीण भागातील समंधित लहान मोठया व्यवसायावर व हातावर मजुरी करणारे यांच्या वर पडला.
ग्रामीण भागातही प्रत्येक व्यवसायात स्पर्धा वाढली आहे परंतु ग्राहकांची संख्या घटली त्यात कर्जाची रक्कम देतांना फायनान्स कंपण्यानी महिलांना अटी व शर्ती मध्ये बांधल्यामुळे महिला वर्गाला कर्जाची रक्कम परत करतांना चांगलीच तारांबळ उडाली आहे व काही महिलांनी प्रत्येक हफ्त्याला वसुलीला आलेल्या फायनान्सच्या कर्मचाऱ्याला कि साहेब सध्या आमच्या घरच्यांना व मला लॉकडाऊन मुळे अनेक महिलांना व पुरुषांना काम नसल्याचे सांगण्यात येत आहे पण तरी सुद्धा फायनान्स कर्मचारी म्हणतात तुम्ही कुठूनही पैसे आणा पण फायनान्सचे पैसे भरा तगादा लावत आहे त्यामुळे अनेक महिला चिंतेत पडल्या आहेत तरी लॉकडाऊनच्या काळातील हफ्ते माफ करण्यात यावे असे फायनान्स धारक महिला कडुन बोलले जात आहे.