नागपुर शरिरसंबंधाचे व्हिडीओ बनवुन विवाहितेला ब्लॅकमेल.

54
नागपुर शरिरसंबंधाचे व्हिडीओ बनवुन विवाहितेला ब्लॅकमेल.
नागपुर शरिरसंबंधाचे व्हिडीओ बनवुन विवाहितेला ब्लॅकमेल.
नागपुर शरिरसंबंधाचे व्हिडीओ बनवुन विवाहितेला ब्लॅकमेल.
युवराज मेश्राम नागपुर जिल्हा प्रतिनिधी️
नागपूर,दि.23 एप्रिल:- नागपुर येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. शरिरसंबंध प्रस्थापित करताना कैमे-याचा माध्यमातुन व्हिडीओ तयार करून त्या आधारे विवाहितेला ब्लॅकमेल करणाऱ्या एका आरोपीविरुद्ध नागपुर येथील सीताबर्डी पोलिसांनी शुक्रवारी आरोपी यश नेमादे वय 28 वर्ष याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला.
नागपुर येथील सीताबर्डी पोलिसांना एका विवाहित महिलेने तक्रार दिली की, गड्डीगोदाम भागात राहते. ती विवाहित असून आरोपी अविवाहित आहे. तिची आणि आरोपी नेमादेची गेल्या वर्षी फेसबूकवर ओळख झाली होती. फेसबुकवरील मैत्रीला सुरुवात झाल्यानंतर त्यांनी एकमेकांना आपली पर्सनल माहिती आणि मोबाईल नंबरही एक्स्चेंज केले. नंतर ते सलग संपर्कात राहू लागले. भेटीगाठीही वाढल्या. एकांतवासात भेटी होऊ लागल्याने त्यांची जवळीक जास्तच वाढली. याच्या मनात प्रेम अंकुर फुलले यातून त्यांनी एक दिवस सीताबर्डीतील एका लॉजवर शरिरसंबंध प्रस्थापित केले.
यावेळी नेमादेने त्याच्या मोबाईलमध्ये शरिरसंबंधाचा व्हिडीओ तयार केला. दुसऱ्यांदा त्याने अश्लिल फोटो काढले. दरम्यान, अलिकडे त्यांच्या संबंधातील गोडवा संपला. त्यामुळे एकेमेकांवर आरोप-प्रत्यारोप होऊ लागले.
तो तिला अश्लिल फोटो आणि व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेल करणे सुरू केल्याने ती हादरली. तिने काही दिवस विचारविमर्श केल्यानंतर शुक्रवारी सीताबर्डी पोलीस ठाणे गाठले. नेमादेने बलात्कार केल्याची तक्रार तिने पोलीस ठाण्यात नोंदवली. प्रकरण तपासल्यानंतर ठाणेदार अतुल सबनिस यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रियंका देवकर यांनी आरोपी नेमादेविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.