मानुसकी आणि सामाजिक बांधिलकीचा भाव जपणारी अध्यापक.
मानुसकी आणि सामाजिक बांधिलकीचा भाव जपणारी अध्यापक.
मानुसकी आणि सामाजिक बांधिलकीचा भाव जपणारी अध्यापक.
मानुसकी आणि सामाजिक बांधिलकीचा भाव जपणारी अध्यापक.
मानुसकी आणि सामाजिक बांधिलकीचा भाव जपणारी अध्यापक.
️प्रा. अक्षय पेटकर, वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी️ 
हिंगणघाट,दि.24 एप्रिल:- आज कोरोना वायरस महामारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आज सर्व माणसे माणसापासून दुर व्हायला लागली आहेत. एवढं विदारक दृश्य आमची पिढी कदाचित प्रथमच अनुभवत आहे…  हा आजार क्षणात कुणाला व कधी आपल्या कवेत घेणार याचा नेम नाही. सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव अतिशिघ्र गतीने फैलावत जातो आहे. यामध्ये तालुक्यातील वाघोली केंद्रातील डायगव्हान (हेटी) दही-दुध व्यवसाय करणा-या लोकांची वस्तीतील छोट्याशा गावात 33 कुटूंबातील 57 व्यक्ती कोरोना वायरस बाधित झाल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे 31 मार्च पासून संपूर्ण गावाला बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. गावातील दही-दुधाचा व्यवसाय करणा-या लोकांना विलगीकरणात बंदीस्त व्हावे लागले, स्वाभाविकच त्यांचा व्यवसाय, रोजगार बंद झाला. 
14 दिवस ही माणसे कसे जगणार, त्यांच्या दैनंदिन गरजांचं काय? याची चिंता गावातील पहिले गुरुजी यांना लागली. त्यामुळे अध्यापनातील गुरुजीने कोरोनाचे प्रादुर्भावाने बाधीत गरजू व्यक्तींना आपल्या माध्यमातून मदत व्हावी म्हणून सकारात्मक विचारधारा असणाऱ्या लोकांना एकत्र घेत गावकऱ्यांच्या मदतीचा विदा उचलला. यात केंद्रप्रमुख यादव तुराळे, आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती मगर, जि.प शाळा डायगव्हान जामणीचे मुख्याध्यापक चंद्रकांत ठाकरे, गजानन भालकर, तसेच नवकेतन विद्यालय जामणीचे मुख्याध्यापक योगेश्वर कलोडे आदी सज्जनांनी सहकार्य केले. सर्वांनी एकत्र येऊन शाळेतील सर्व अध्यापकांना मदतीचे सहकार्य मागितले. त्याला शाळेतील सर्व गुरुजनांनी तसेच समाजातील इतर दानशूर मान्यवरांनी मदतीचे हात समोर करीत गावतील 55 कुटूंबांना सर्व जीवनावश्यक वस्तुसह धाण्याच्या किटचे वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले.
 
गुरुजींनी दाखवलेले सामाजिक आणि मानवी भाव हे या महामारीत गावातील कुटूंबांना फार मोठ्या आधार देणारा ठरला आहे. या उपक्रमात पंचायत  समिती हिंगणघाटचे गटशिक्षणाधिकारी अशोक कोडापे, टाकळे यांचे सहकार्य लाभले. सामाजिक बांधिलकीचा भाव जोपासणाऱ्या या तिनही शाळेतील गुरुजन, अध्यापकांचे हे अभिनंदनीय कार्य खरोखरच माणुसकीला शोभणारे आहे.
 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here