हिंगणघाट येथे कोविड लसीकरण केन्द्राचे उद्घाटन.
हिंगणघाट येथे कोविड लसीकरण केन्द्राचे उद्घाटन.
हिंगणघाट येथे कोविड लसीकरण केन्द्राचे उद्घाटन.
हिंगणघाट येथे कोविड लसीकरण केन्द्राचे उद्घाटन.
हिंगणघाट येथे कोविड लसीकरण केन्द्राचे उद्घाटन.
️प्रा. अक्षय पेटकर, वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी️
हिंगणघाट,दि.24 एप्रिल:- वर्धा जिल्हात मोठ्या प्रमाणावर कोरोना वायरस बाधीत रुग्णांची भर पडत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे घरी रहा, सुरक्षित रहा, आणि कोरोना लस घ्या. असे म्हणत दिनांक 23 एप्रिल शुक्रवार ला नागरिकांच्या सुविधेकरीता नगरपालिका प्रशासनाच्या वतीने हिंगणघाट येथे ‘नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र’ची सुरुवात करण्यात आली आहे.
हिंगणघाट शहरातील छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड परीसरातील, इंदिरा गांधी वॉर्ड येथे हे कोवीड-19 लसीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. या  कोविड-19 लसीकरण केन्द्राचे उद्घाटन हिंगणघाट नगर पालिकेचे नगराध्यक्ष प्रेम बसंतांनी यांच्या हस्ते पार पडले.
 
यावेळी प्रमुख्याने नगर पालिकेचे उपाध्यक्ष चंद्रकांत घुसे, स्वास्थ सभापती सुदर्शन गवळी, नगर पालिका सदस्य वंदना कामडी, मुख्याधिकारी अनिल जगताप, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. माधुरी कुचेवार, कोविड-19  नियंत्रण अधिकारी विशाल ब्राम्हणकर, डॉ. वरभे यासह सेवारत आरोग्य कर्मचारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. 
हिंगणघाट नगर पालिकेच्या वतीने दोन्ही प्राथमिक आरोग्य केंद्रांना कोविड रुग्णाकरिता औषधी साठा मोठ्या प्रमाणात पुरविण्यात आला आहे. आशा वर्कर, कार्यारत आरोग्य कर्मचारी यांचे करिता आवश्यक सुरक्षा साहित्य उपलब्ध करून देण्यात आले.  हिंगणघाट शहरात कोरोना वायरस विषाणूचा वाढत असलेला प्रादुर्भाव बघता सर्व नागरिकांनी कोविड-19 चे लसीकरण करून घ्यावे असे नगराध्यक्ष प्रेम बसतांनी यांनी उद्घाटन प्रसंगी सांगितले. प्रसंगाचे औचित्य साधत प्रेम बसतांनी यांनी कोवीड लसीकरणाचा दुसरा डोज घेऊन सर्व नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here