‘सोनियांचे भोजनभाऊ भाजपला रोखू शकतात का?’

70

मुंबई: विरोधी पक्षाच्या नेत्यांना डिनरसाठी आमंत्रित करून काँग्रेसनं भाजपविरोधात सुरू केलेल्या मोर्चेबांधणीवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शंका उपस्थित केली आहे. ‘सोनिया गांधी यांनी दिलेल्या डिनरसाठी जमलेल्या नेत्यांना उद्धव यांनी ‘भोजनभाऊ’ म्हणून हिणवले आहे. ‘या साऱ्यांनी सोनियांच्या घरी जेवण करून फोटो काढले असले तरी त्यांच्या भाजपविरोधात रणशिंग फुंकल्याची भावना नव्हती. त्यामुळं या भोजनभाऊंचं मोदी सरकारच्या निष्फळ सर्जिकल स्ट्राइकप्रमाणे होऊ नये,’ अशी अपेक्षा उद्धव यांनी व्यक्त केली आहे. सोनिया गांधी यांनी दिल्लीत नुकतेच विरोधी पक्षाच्या नेत्यांसाठी डिनरचं आयोजन केलं होतं. विरोधी पक्षांतील २० छोट्या-मोठ्या नेत्यांनी त्यासाठी हजेरी लावली. विरोधकांच्या या ‘डिनर डिप्लोमसी’वर उद्धव यांनी दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून भाष्य केलं आहे.