विरूर स्टेशन येथील रुग्णालय सुरू करा, परीसरातील जनतेची मागणी.

तिरूपति नल्लाला
राजुरा, विरूर ग्रामीण प्रतिनिधि
विरुर राजुरा:- तालुक्यात मोठ्या प्रमाणात शासनाच्या इमारती बांधल्या आहेत. असीच एक बिल्डिंग विरुर येथे आरोग्य विभाग यानी बांधली आहे. कोरोना च्या महामारित जनता हतबल झाली आहे. लोकप्रतिनिधी यांनी बांधलेल्या बिल्डिंग चां उपयोग जनतेसाठी की शोभेची वास्तू म्हणून जनता विचारणा करीत आहे.
गेल्या वर्षी पेक्षा या वर्षी शेतकरी बांधव आर्थिक संकटात सापडला असल्याने,आणि ग्रामीण भागात आरोग्याचे तीन तेरा वाजल्याने जनता भयभीत झाली आहे. ग्रामीण भागात आरोग्य सेवा देणारे अधिकारी मुख्यालयी राहत नसल्याने नागरिक, प्रशासन, लोकप्रतिनिधी यांनी याबाबत विचार करून विरुर् येथील बांधलेले रुग्णालय जनतेच्या आरोग्य उपचारासाठी खुले करावे सोबतच आफिस स्टाप,साहित्य आणि कर्मचारी मुख्यालयी राहील अशी त्या कर्मचारी यांची व्यवस्था करावी.
या वर्षी ग्रामीण भागात रुग्णाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने,आणि गरीब कुटुंबाला चंद्रपूर, राजुरा शहरात उपचार घेणे आर्थिक दृष्ट्या परवडत नसल्याने ,प्रशासन विभागाने आणि लोकप्रतिनिधी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्याची मागणी परिसरातील जनतेची असल्याने तात्काळ सुरू करावी.