कोरोना महामारीच्या दरम्यान पिळोदा खु. येथील घरगुती नळ कनेक्शन खंडित करण्यात येऊ नये: सौ.रजनीगंधा पाटील.

52

कोरोना महामारीच्या दरम्यान पिळोदा खु. येथील घरगुती नळ कनेक्शन खंडित करण्यात येऊ नये: सौ.रजनीगंधा पाटील.

कोरोना महामारीच्या दरम्यान पिळोदा खु. येथील घरगुती नळ कनेक्शन खंडित करण्यात येऊ नये: सौ.रजनीगंधा पाटील.
कोरोना महामारीच्या दरम्यान पिळोदा खु. येथील घरगुती नळ कनेक्शन खंडित करण्यात येऊ नये: सौ.रजनीगंधा पाटील.

✒किरण बापु माळी,यावल तालुका प्रतिनिधी✒
यावल:- राज्यात आणि जिल्हात आज मोठ्या प्रमाणात कोरोना वायरसच्या महामारीने जनता त्रस्त आहे. लोकांना दोन वेळेचे जेवन करायला मोठ्या मनस्ताप सहन करावा लागत आहे. तर दुसरीकडे यावल तालुक्यातील पिळोदे खु. ग्रामपंचायत कडुन या कोरोना महामारीच्या दरम्यान गावातील पाणीपुरवठा करणारे घरगुती नळ कनेक्शन खंडीत करण्याची मोहीम राबविली जात आहे. पिळोदे खु. गावातील सामान्य जनतेला वेठीस आणत आहे.

पिळोदे खु. ग्राम पंचायत मार्फत सुरु असलेल्या घरगुती नळ कनेक्शन खंडित करवाई ही गावातील नागरिकांना वरती खरोखर एक प्रकारची दडपशाहीच होत असल्याचे म्हणावे लागेल. असा आरोप येथील ग्रामपंचायत सदस्या सौ.रजनीगंधा पाटील यांनी लेखी पत्राद्वारे प्रसिद्धि केलीली आहे.

सध्या महाराष्ट्रामध्ये कोरोना चा मोठा उद्रेक सुरु आहे. रोज लाखो कोरोना वायरस बाधीत रुग्ण समोर येत आहे. राज्यात आणि जिल्हात संचारबंदी आणि लॉकडाउन सुरु आहे. यामुळे सर्व जनतेचे जनजीवन विस्कळित झाले आहे. शेतकरी, कामगार, मजूर, छोटी टपरी वाले, व्यवसायीक या सर्वांचेच मोठे हाल होत आहे .या कोरोना महामारी दरम्यान सर्व स्तरातील नागरिकांची आर्थिक दृष्ट्या हात बांधले गेले आहे.त्यात कोणाचे हातचे काम गेले तर कोणाच्या शेतातील पिकाला योग्य तो मोबदला मिळाला नाही.त्यामुळे लोकांकडे आता पैसा नाही. तरी राज्य सरकार विविध योजनांना मार्फत हातावरती पोट असणाऱ्या तसेच शेतकरी वर्गासाठी शक्य होईल तितकी मदत करत आहे. मात्र पिळोदे खु ग्रामपंचायतीच्या वतीने पिळोदे वासियांचे घरगुती नळ पाणी पुरवठा खंडित करण्याची निर्णय घेतला आहे. तो ह्या महामारी काळा दरम्यान कितपत योग्य आहे ?असा प्रश्न उपस्थित होत आहे. याचे ग्रामपंचायत प्रशासनाने आत्मचिंतन करावे. या जिव्हाळ्याच्या प्रश्नासंबंधी पिळोदे खुर्द ग्रामपंचायत सदस्या सौ रजनीगंधा अजय पाटील यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला लेखी पत्र देऊन आवाज उठवलेला आहे.

त्यामुळे सदर ग्रामपंचायतीच्या नागरिकांच्या विरोधी कृतीला ग्रामपंचायत सदस्या व तसेच गावातील नागरिक म्हणून रजनीगंधा पाटील यांनी या निर्णयाचा जाहिर निषेध दर्शविला आहे तसेच गावातील पाणी पुरवठा करणारे घरगुती नळ कनेक्शन खंडित करण्याचा निर्णय लवकरात लवकर रद्द करावा. अशी मागणी लेखी पत्राद्वारे सौ.पाटील यांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे
केलेली आहे.