लसीकरणाला प्रोत्साहन करण्याकरीता स्थानिक प्रशासन जनतेच्या दारी.

✒मनोज खोब्रागडे✒
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर (लाखनी):- तालुक्यातील मुरमाडी/ तुप येथील जनतेला लसीकरणा साठी प्रोत्साहित व्हावे या उदार्थ हेतूने मुरमाडी/तुप येथील स्थानिक प्रशासन जनतेच्या घरी जाऊन त्यांना लसीकरण करण्याकरिता भाग पाडत आहे.जिल्ह्यात १ मार्चपासून नागरिकांचे लसीकरण करणे सुरू झाले असून शासकीय रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व काही खाजगी रुग्णालयात सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत लसीकरण देणे सुरू आहे .ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच लोकप्रतिनिधी नी लस घेण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करावे असे आव्हान जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले आहे. याच आदेशाचे पालन करीत मुरमाडी येथील स्थानिक प्रशासन जनतेच्या दारी पोहोचले आहे.
सध्या संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना या संसर्गजन्य रोगाची महामारी च्या जनु उद्रेक झाला आहे .केंद्र सरकार आणि राज्य सरकार या कोरोना संसर्गजन्य रोगाच्या महामारी च्या उद्रेका पासून बचाव करण्याकरिता लसीकरण मोहीम राबवत आहे .१ मार्च पासून ज्येष्ठ नागरिकांना जिल्ह्यात लसीकरण करणे सुरू झाले असून ४५ ते ६० वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शन सूचनेनुसार नागरिकांच्या सोयीसाठी लसीकरण केंद्र वाढवण्यात आले आहेत. पण काही अफवा मुळे सामान्य जनतेमध्ये लसीकरणा बद्दल संभ्रम निर्माण होत आहे. या अफवांमुळे मुरमाडी/तुप येथील काही जनता लसीकरण घेण्यास मागेपुढे पाहत आहे लसीकरण न घेणाऱ्या व्यक्तींच्या घरी जाऊन त्यांना लसीकरणासाठी प्रोत्साहित करण्याचे काम स्थानिक प्रशासन करीत आहे.
ग्रामपंचायत मुरमाडी/तुप चे सरपंच ताराचंद निरगुडे, ग्रामसेवक तरजुले, तलाठी मरस्कोल्हे, आशा सेविका आणि ग्रामपंचायत मुरमाडी /तुप चे सदस्य गण यांनी लसीकरण न करणाऱ्या व्यक्तींच्या घरी जाऊन लसीकरण करण्याकरिता त्या व्यक्तीला प्रोत्साहित करीत आहेत. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता ४५ ते६० या वयोगटातील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी लसीचा लाभ घ्यावा ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे असे आव्हान मुरमाडी/तुप च्या जनतेला स्थानिक प्रशासनाने केली आहे.