सावनेर शहरासह तालुक्यात कडकडीत बंद; पोलिसांचे आव्हान घराबाहेर पडल्यास दंडात्मक कारवाई.

युवराज मेश्राम नागपुर जिल्हा प्रतिनिधी
नागपूर:- जिल्ह्यातील सावनेर तालुक्यांमध्ये अनेक दिवसापासून कोरोना वायरस मोठ्या प्रमाणात वाढत असून पहिल्या लाटे पेक्षा दुसरी लाट अतिशय भयंकर होत चालली आहे, यामुळे रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. राज्यामध्ये महाराष्ट्र शासनाने संपुर्ण कडक लॉकडाउन आणि संचारबंदी लागू केलीची घोषणा करून अनेक निर्बंध लादण्यात आले आहे. या दरम्यान वैद्यकीय सेवा वगळता सर्वच प्रतिष्ठाने सकाळी 11 ते वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश काढण्यात आले आहे. या आदेशामुळे सकाळी उठून लवकर घराबाहेर पडणे खरेदी करण्यास प्राधान्य देत आहे. यामुळे सकाळच्या सुमारास रस्त्यावर थोडीफार गर्दी पाहायला मिळत आहे. सकाळी अकराच्या नंतर महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार सावनेर येथील उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक तळवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मारुती मुळक सावनेर तालुक्यात अत्यंत जोमाने कार्याला लागले आहेत व त्यांच्या बरोबर पोलीस स्टेशनची टीम मोठ्या प्रमाणात लॉकडाउन आणि संचारबंदीच्या कार्याला लागलेली आहे.
सावनेर पोलिस निरीक्षक मारोती मुळक याची मुलाखत घेताना युवराज मेश्राम नागपुर जिल्हा प्रतिनिधी
या कार्याला रासकर मॅडम, एपीआय सतीश पाटील, एपीआय खुलेकर साहेब, कराडे साहेब, मांढरे साहेब व पोलीस स्टेशन मधील सर्व पोलीस कर्चार्यांसह लॉकडाउन आणि संचारबंदीच्या कामाला लागले आहे. त्याचप्रमाणे सावनेर पोलीस स्टेशन मध्ये 75 कर्मचारीवर्ग असून 43 गावे पोलिस स्टेशन अंतर्गत येतात यामुळे पोलिसांना मोठी कसरत करावी लागत आहे. सावनेर पोलीस स्टेशन अंतर्गत सावनेर शहर वगळता पाटणसावंगी, तेल, कामठे, धापेवाडा, वाघोडा, खदान, भन्साळी, टाकळी, मानेगाव, सोनपूर, पिपळा, किनखेडे ही पोलिस स्टेशन मधील मोठे गावे असून यामुळे पोलिसांना फार धडपड करावी लागते. शासनाने लावलेल्या निर्बंधनुसार नाका-बंदी व ग्रामीण भागामध्ये गावागावांमध्ये जाऊन निर्बंध लावण्यास पोलीस सज्ज असते. सावनेर शहरांमध्ये गांधी चौक धापेवडा रोड वरील गडकरी चौक पाटण सांगी शिंदवाडा रोड शिवाजी पुतळा जवळ या ठिकाणी नाकाबंदी करण्यात येत आहे. त्यामुळे पोलीस स्टेशनचे निरीक्षक मारुती मुळक व त्यांची टीम स्वतः दौरे करून कोरोना वायरस विरोधात लढा देण्यास सज्ज आहे. तसेच दुकानदार व्यापारी लहान दुकानदार यांना योग्य मार्गदर्शन करून शासनाच्या नियमाचे योग्य पालन करा व कोरोना वायरस हाकलून लावा अशा सूचना तहसीलदार सावनेर नगर परिषद अध्यक्ष सावनेर नगरपरिषद, सावनेर पंचायत समिती खंडविकास अधिकारी सावनेर व सावनेर पोलीस स्टेशनचे निरीक्षक मारुती मुळक यांनी पत्रकार युवराज मेश्राम यांना माहिती घेतली असता योग्य मार्गदर्शन करण्यात आले.