कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता धानोरा येथे सॅनिटाइजरची केली फवारणी.
हर्षल घोडे
तालुका प्रतिनिधी राळेगाव
राळेगाव:- यवतमाळ जिल्ह्यात कोरोना झपाटय़ाने वाढत असताना बघून राळेगाव तालुक्यातील धानोरा गावातील ग्रामपंचायतींने दखल घेत संपूर्ण गावामध्ये करण्यात आली सॅनिटाइजरची फवारणी. कोरनाचा गावात शिरकाव होऊ नये म्हणून ग्रामपंचायतिने पाऊल उचलत हा निर्णय घेत गावाच्या कानाकोपर्यात करण्यात आली सॅनिटाइजरची फवारणी, फवारणी करन्यासोबतच गावकर्याना सामाजिक अंतर आणि नेहमी हात वारवांर स्वच्छ धुत राहावे, मास्क लावावे व सॅनिटाइजर चा वापर करावे हि सूचना पण देण्यात आली. ग्रामपंचायतीच्या या निर्णयाने गावातील लोंकामध्ये काही प्रमाणांत तरी भितिचे वातावरण कमी झाले असे दिसून येते , धानोरा गावासारखे इतर गावांनी सुद्धा हे पाऊल समोर टाकून आपली व आपल्या गावाची सुरक्षा घेणे अत्यंत गरजेच आहे.