वर्धेत रेमडेसिविर निर्मिती प्रक्रियेला प्रारंभ

56

✒️✒️वर्धेत रेमडेसिविर निर्मिती प्रक्रियेला प्रारंभ

वर्धेत रेमडेसिविर निर्मिती प्रक्रियेला प्रारंभ
वर्धेत रेमडेसिविर निर्मिती प्रक्रियेला प्रारंभ

 ✒आशीष अंबादे,वर्धा जिल्हा प्रतिनिधी ✒
वर्धा,दि.29 एप्रिल::- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने वर्धेतील सेवाग्राम औद्योगिक वसाहतीतील जेनेटिक लाईफ सायन्सेस प्रा. लि. मधील प्रयोगशाळेत रेमडेसिविर निर्मिती प्रक्रियेला प्रारंभ झाला, अशी माहिती जेनेटिक लाईफ सायन्सचे संचालक डॉ. महेंद्र क्षीरसागर यांनी दिली. गुरुवार 29 रोजी या इंजेक्शनसाठी लागणारा कच्चा माल पोहोचणार आहे. त्यानंतर पुढील दोन दिवसांत प्रत्यक्ष उत्पादनाला प्रारंभ होईल. येथील कोरोनाबाधितांना दिलासा मिळणार आहे.✒️