भंडारा जिल्ह्यात एक हजार खाटांचा सर्व सुविधा असलेला जम्बो कोविड हॉस्पिटल उभारणार
हॉस्पिटल साठी जागेची निवड

✒मनोज खोब्रागडे✒
पूर्व विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
भंडारा :- हा हॉस्पिटल पूर्व विदर्भातील सर्वात मोठा कोविड हॉस्पिटल असणार आहे व यासाठी आज सनफ्लयाॅग कंपनी (वरठी) जवळील असलेल्या रिक्त जागेवर जिल्हाचा एकमेव कोविड सेंटर (सर्व सुविधा युक्त) उभारण्याकरीता आज जागेची पाहणी केली. लवकरच हॉस्पिटल सुरू होणार.
या कोविड हॉस्पिटल मुळे जिल्हाच रुग्णांना सर्व सुविधा उपलब्ध होणार. रुग्णांच्या स्वास्थ्य व जिल्ह्य़ातील जनतेच्या हितासाठी हा रुग्णालयात बनविण्यात येत आहे. यावेळी जिल्हाधिकारी, अप्पर पोलीस अधीक्षक, जिल्हा शल्य चिकित्सक व अन्य अधिकारी वर्ग उपस्थित होते.