फायर ऑडिट न केल्याने वसई शहरातील दोन कोवीड रुग्णालय बंद.
फायर ऑडिट न केल्याने वसई शहरातील दोन कोवीड रुग्णालय बंद.

फायर ऑडिट न केल्याने वसई शहरातील दोन कोवीड रुग्णालय बंद.

फायर ऑडिट न केल्याने वसई शहरातील दोन कोवीड रुग्णालय बंद.
फायर ऑडिट न केल्याने वसई शहरातील दोन कोवीड रुग्णालय बंद.

मनोज कांबळे, नालासोपारा प्रतिनिधी✒
नालासोपारा दि.29 एप्रिल :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वसई विरार शहरातील रुग्णांची सरासरी संख्या आठशेच्या घरात पोहचली आहे. त्यातच अग्निशामक दलाच्या कारवाईच्या भीतीने वसई शहरातील वालीव येथील ‘निऑन’ आणि वसई फाटा येथील ‘संस्कृती’ हि कोवीड रुग्णालय 29 एप्रिल पासून बंद करण्यात आली आहेत. यामुळे शहरातील 70 कोवीड बेड कमी झाले आहेत.

विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील आग दुर्घटनेच्या पोलीस चौकशी दरम्यान वसई विरार अग्निशामक विभागाने शहरातील काही रुग्णालयांनाफायर ऑडिटकेल्याशिवाय ना हरकत दाखला दिला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. फायर ऑडिट न झालेल्या रुग्णालयांमध्ये वरील निऑन आणि संस्कृती या दोन रुग्णालयांचा समावेश होता. रुग्णालय प्रशासन आणि अग्निशामक दलाच्या अश्या हलगर्जी पणामुळे शहरातील रुग्णालयात उपचार घेणाऱया तीन हजारांहून जास्त रुग्णाच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न उद्भवला आहे.

दुसरीकडे शहरातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी नालासोपारा येथे 200 ऑक्सिजन बेड्चे आणि बोळींज येथे 150 बेड्सचे शासकीय कोवीड सेंटरचे बांधकाम सुरु असल्याची घोषणा आमदार क्षितिज ठाकूर यांनी केली आहे. या कोवीड सेंटर मध्ये रुग्णांसाठी औषधपुरवढा, पुरेसा ऑक्सिजन, डॉक्टर, नर्सेस यांची योग्य व्यवस्था असून लवकरच हि कोवीड सेंटर्स वसई विरार शहरातील रुग्णांसाठी चालू होतील असे आश्वासन निरीक्षण भेटी दरम्यान आमदार क्षितिज ठाकूर वसई विरार मधील जनतेला दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here