हिंगणघाट पादचारी व्यक्तिला ट्रकने उडविले.

✒आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
हिंगणघाट,29:- स्थानिक उपजिल्हा रुग्णालय चौकात राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे उड्डाणपुल चढताना संत तुकडोजी वार्ड येथील भोजराज रामचंद्र घाटुडे (36) यांना नागपुर कडून हैदराबाद कडे भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रक क्रमांक एन.एन.01 ए.बी. 1069 ने चिरडले. हा अपघात सकाळी 10.30 च्या दरम्यान घडला असून ट्रक चालक घटनास्थळावरुन पसार झाला आहे.
हिंगणघाट पोलिसांनी दारोडा टोल नाक्यावरुन ट्रक पकडला त्यावेळी चालक व वाहक ट्रक सोडून पळून जाण्यात यशस्वी झाले. तेव्हा हा ट्रक दारोडा टोल नाक्यावरुन हिंगणघाट पोलिसांनी पो.स्टेशन येथे आणून जप्त करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पी. एस. आय. गंगाधर पेन्दोर, महेंद्र आकरे, दिपक मस्के, करीत आहेत.