दापोरी कासार येथील युवकाचा नदीत बुडून मृत्यू

49

दापोरी कासार येथील युवकाचा नदीत बुडून मृत्यू

दापोरी कासार येथील युवकाचा नदीत बुडून मृत्यू
दापोरी कासार येथील युवकाचा नदीत बुडून मृत्यू

हर्षल घोडे, तालुका प्रतिनिधी राळेगाव

राळेगाव:- तालुक्यातील दापोरी कासार हे गाव नदी काठावर वसलेले छोटेसे खेडे असून, तेथील युवक संतोष दिलीप काळे या युवकाचा नदीत बुडून मृत्यू झाला.पण ही आत्महत्या की अपघाताने मृत्यू किव्हा काही वेगळे याबाबत पूर्ण माहिती अजून मिळालेली नाही.मूळ दापोरी (कासार) येथील रहिवासी असणारा हा युवक त्याचे वय अंदाजे 33 वर्ष हा काही वर्षांपासून वर्धा जिल्ह्यातील आजनसरा येथे राहत असल्याची माहिती मिळाली आहे.

काल पासून तो युवक बेपत्ता असल्याची माहिती आहे.घरी त्याने मी गाय पोहचवून देतो म्हणून तो घरातून निघून गेला.आज सकाळी नदी मध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला.राळेगाव पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक प्रकाश तुनकलवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हवा.शालीक लडके,पो.कॉ.राहुल मोकळे हे अधिक तपास करीत आहे.