कासारखेडा ग्रामपंचायत चौकातील महामानव गौत्तम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो असलेल्या बोर्डावर मारला दगड; गुन्हा दाखल

किरण माळी यावल प्रतिनिधी

यावल:- तालुक्यातील कासारखेडा येथील ग्राम पंचायत चौकातील महामानव गौत्तम बुद्ध व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या लोखंडी बोर्डावरील असलेल्या फोटोवर गावातील एकाने दगड मारून जातीय भावना दुखाल्याप्रकरणी अखेर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेली माहीती अशी की, कासारखेडा तालुका यावल येथे दिनांक 25 एप्रिल रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास गावातील ग्राम पंचायत चौकातील समाज मंदीर समोर लावलेले लोखंडी बोर्ड या वर महामानव गौत्तम बुद्ध व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो असुन गावातील हरिष श्रीराम न्हावी याने दगड मारून जातीय भावना दुखाल्या या संदर्भात ईश्वर आसाराम सोनवणे वय 50 वर्ष राहणार कासारखेडा यांनी फिर्याद दिल्याने यावल पोलीस स्टेशनमध्ये भाग 5 भादवी कलम 295 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, पुढील तपास पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अजिज शेख हे करीत आहे.

दरम्यान या घटनेचा गुन्हा दाखल करण्यास स्थानिक पोलीसांनी टाळाटाळ व नकार दिल्याने परिसरातील काही कार्यकर्त्यांनी ऑल इंडीया पॅंथर सेनेच्या जिल्हा अध्यक्ष शरद बावस्कर यांची भेट घेतली व सदर घटने बाबतची सविस्तर माहीती त्यांना दिली त्यानंतर शरद बावस्कर यांनी पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे प्रत्यक्ष घडलेल्या घटनेची माहीती दिली व आपण गुन्हा दाखल करावा असे सांगीतल्याने अखेर पोलीस निरिक्षकांनी समय सुचकता बाळगल्याने आज दिनांक 28 एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here