घरी आला तेव्हा स्वयंपाक तयार नव्हता; नवरा झाला हैवान, बॅटच्या एका फटक्याने पत्नीचा घेतला जीव.

61

✒सांगली जिल्हा प्रतिनिधी✒
सांगली,दि.30 एप्रिल:-
सांगली जिल्ह्यातील कुपवाडतुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एक व्यसनी नव-याने आपल्या बायकोची हत्या केल्याच समोर आल आहे. त्यामूळे सर्वीकडे हयहय व्यक्त करण्यात येत आहे.

सांगलीमध्ये नवरा बायकोमध्ये किरकोळ वाद सुरू होता. या किरकोळ वादाचे पयावसन एका गंभीर गुन्हात झाले. नव-याने रागाच्या भरात बायकोला बॅटने मारहाण केली. या मारहाणीत बायकोच्या डोक्याला बॅटचा जोरदार फटका मारला. हा बॅटचा फटका इतका जोरदार होता कि, ती रक्तबंबाळ होऊन जागेवरच कोसळली. तिला तात्काळ उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

पत्नी कोमल जाधव आणि पती राहुल जाधव असे या जोडप्याचे नाव आहे. नवरा राहुल जाधव हा व्यसनी होता. दोघेही सांगली जिल्ह्यातील कुपवाड भागातील अहिल्यानगर झोपडपट्टीत राहत होते. त्या दिवशी आरोपी पती राहुल हा दारु पिऊन नशेत घरी आला. घरी आल्यावर त्याला भुक लागली. जेवण तयार झाले नव्हते. यावरुन दोघांमध्ये वाद झाले. स्वयंपाक का केला नाहीस, मला भूक लागली आहे, असे म्हणत संतप्त पतीने दारुच्या नशेत पत्नी कोमल हीला जबरदस्त मारहाण केली. तिला शिवीगाळ करत हातातील बॅट जोरात कोमलच्या डोक्यात घातली. बॅटीच्या एका फटक्यातच पत्नी कोमल रक्तबंबाळ होऊन जमिनीवर कोसळली.

रक्ताने माखलेल्या कोमलने नवरा राहुलच्या विरोधात कुपवाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर तिला उपचारांसाठी रुग्णालयात हलवले. मात्र बॅटचा मार इतक्या जोरात बसला होती की उपचारांदरम्यान कोमलचा मृत्यू झाला. कुपाड पोलिसांनी आरोपी पती राहुल याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर खुनाचा आरोप लावून गुन्हा दाखल करण्यात आला आहे