कोविड रुग्णालयात नेताना कोरोना बाधित रुग्ण पळाला; चार दिवसांनी शेतात घेतला गळाफास.

56

✒गोपीनाथ मोरे भोकरदन तालुका प्रतिनिधी✒
जालना/भोकरदन,दि.30 एप्रिल:- जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका कोरोना वायरस बाधित रुग्णांने शेतात गळाफास लाऊन आत्महत्या केल्याच समोर येत आहे. त्यामुळे सर्वीकडे हयहय व्यक्त करण्यात येत आहे.

भोकरदन येथील पिंपळगाव येथील एका व्यक्तीला कोरोना झाला असे रिपोर्ट वरून समोर आले होते. त्याची ऑक्सिजन लेव्हल कमी होत असल्याने त्या कोरोना बाधित रुग्णांला जालना कोव्हिड केअर सेंटर मध्ये नेण्यात येत होते. मात्र त्या रुग्णाने रस्त्यातुनच पळ काढला व आपले गाव गाठले. त्यानंतर तो रुग्ण तीन दिवस लपून राहिल्यानंतर एका शेतात जाऊन आत्महत्या केली. सदर व्यक्तीचे नाव कैलास लक्ष्मण काळफळे वय 50 वर्ष असे असून ही घटना गुरूवारी सकाळी नऊच्या दरम्यान समोर आली आहे.

कैलास लक्ष्मण काळफळे या कोरोना वायरस बाधित रुग्णांला जालना कोविड केअर सेंटरला नेत असतानाच त्यांने आरोग्य विभागाला चकमा देत आपले घर गाठले. मात्र भीतीपोटी त्यांनी शेतात राहणे पंसत केले, कोवीड सेंटर मधून आल्यानंतर त्यांनी चौथ्या दिवशी शेतात झाडाला दोरखंड बाधून गुरूवारी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर घटना पत्नी शेतात गेल्यानंतर निदर्शनास आली. त्यानंतर पत्नीने आरडाओरडा केला. मृत कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे जागेवरच त्याच्यावर अंत्य संस्कार करण्यात आले. कैलास काकफळे यांच्या पश्चात वडील, पत्नी, एक मुलगा दोन मुली असा परिवार आहे.