भंडारा गोंदिया जिल्ह्यासहीत धान उत्पादक शेतकऱ्यांचे धानाचे चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार
◆ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले यांचे प्रयत्न यशस्वी.
◆ येत्या सोमवार पासुन खात्यावर रक्कम जमा होणार.

✒मनोज खोब्रागडे✒
पूर्व विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
भंडारा :- भंडारा गोंदिया जिल्ह्यासहीत धान उत्पादक शेतकऱ्यांचे धानाचे चुकारे मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळ यांच्याकडे शेतकऱ्यांच्या धान खरेदीचे 850 कोटी रुपये एवढी रक्कम वर्ग करण्यात आलेली आहे. येत्या सोमवारपासून सदर रक्कम शेतकऱ्यांना वाटप करण्यात येईल. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धान खरेदी केंद्र आहेत तथा आदिवासी सोसायट्यांची देखील धान खरेदी केंद्र आहेत आणि कोरोना काळात इतर वर्गाप्रमाणे शेतकरी देखील कठीण परिस्थितीतून जात असताना हे चुकारे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. कोरोना काळात राज्य सरकार आर्थिक अडचणीना सामोरे जात असतानाही राज्य सरकारने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धानाचे पैसे दिलेले आहेत. सर्व धान उत्पादक शेतकरी बांधवांना धानाचे चुकारे मिळावेत यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा. नानाभाऊ पटोले यांनी संबंधित विभागाकडे धानाच्या चुकाऱ्यांची मागणी लावून धरली आणि या मागणीमुळे 850 कोटी रुपये एवढी रक्कम सर्व धान उत्पादक शेतकरी बांधवांना भेटणार आहे. महाविकास आघाडी सरकार कायम शेतकऱ्यांसोबत आहे त्यामुळे त्यांना कुठल्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही या दृष्टीने शासन सदैव प्रयत्नरत असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले यांनी सांगितले.