वाघिणीची शिकार प्रकरणी दोन आरोपी अटकेत, दोन फरार.

✒साहिल महाजन यवतमाळ जिल्हा प्रातिनिधी✒
यवतमाळ:- यवतमाळ जिल्हातील झरी (जामणी) तालुक्यातील मुकुटबन येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मांगुर्ला वनपरिक्षेत्रात एका वाघीणीची शिकार करणाऱ्यांना दोघाना मुकुटबन पोलिसांनी अटक केली आहे. तर दोन आरोपी फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहे. अटक केलेल्या दोघांपासून पोलिसांनी वाघिणीच्या हत्येसाठी वापरलेले शस्त्रे व वाघिणीचा एक पंजा पोलिसांनी जप्त केला आहे.
पांढरकवडा वन विभाग अंतर्गत मुकुटबन वन परिक्षेत्रातील मांगूर्ला नियत क्षेत्र व कक्ष क्रमांक 30 मध्ये वाघिण मृत झाल्याची घटना दि. 25 ला समोर आली होती. पोलिसांनी तपासात अनेक बाबीचा शोध घेऊन आरोपींचा शोध लावला.
पोलिसांनी पांढरवाणी येथील लेतू रामा आत्राम वय 45 वर्ष व अशोक लेतू आत्राम वय 25 वर्ष या दोन बाप लेकाना त्यांचे राहते गाव पांढरवाणी येथून अटक करण्यात आली. तर यातील दोन आरोपी अजूनही फरार आहेत.