पुणे येथील रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर ॲट्रॉसिटी, विनयभंग व फसवणुकीचा गुन्हा दाखल.

✒पुणे जिल्हा प्रतिनिधी✒
पुणे:- शिक्षणाच माहेर घर असलेले पुण्यातुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रेल्वे विभागात कार्यरत एका वरिष्ठ अधिकाऱ्यावर ॲट्रोसिटी, फसवणूक व विनयभंगाचा गंभीर गुन्हा पोलिस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आला आहे. विजयसिंग शहाजी दडस वय 40 वर्ष, रा.संगमपार्क, रेल्वे वसाहत, बंडगार्डन असे गुन्हा दाखल झालेल्या रेल्वे अधिका-यांचे नाव आहे.
पिडीत 27 वर्षीय महिलेने पोलिसांत दिलेल्या तक्रारी नुसार, विजयसिंग शहाजी दडस हे रेल्वेच्या पुणे विभागात वरिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत आहेत. फिर्यादी महिला व तिचे पती 2019 पासून सरकारी निवासस्थानच्या आऊट हाऊसमध्ये राहून विजयसिंग शहाजी दडस यांच्याकडे घरकाम करतात. दरम्यान, विजयसिंग शहाजी दडस यांनी फिर्यादीच्या पतीला रेल्वेमध्ये नोकरी लावतो म्हणून दोन लाख रुपयांची मागणी केली होती. त्यांच्या पतीने दीड लाख रुपये दिले होते. यानंतरही दडस यांनी त्यांच्या पतीला नोकरी लावली नाही. अनेकदा वाट पाहून देखील काम होत नाही हे लक्षात आल्यानंतर फिर्यादी व त्यांच्या पतीने दडस यांच्याकडे दिलेले पैसे परत मागितले. मात्र ते नेहमी टाळाटाळ करत होते.
फिर्यादी हे अनुसूचित जाती जमातीचे असल्याचे माहित असूनही त्यांना जातीवाचक शिवीगाळ करण्यात येत होती. यानंतर एके दिवशी दडस यांनी फिर्यादीला शरीर सुखाची मागणी करत जबरदस्तीने किचनमधून बेडरुममध्ये ओढत नेले. तेथे विनयभंग करत अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. यानंतर शिवीगाळ करत दमदाटी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेचा पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक गवारी करत आहेत.