मित्रानेच केला मित्राचा पत्नीवर  अत्याचार; पोलिसांत गुन्हा दाखल.

47
मित्रानेच केला मित्राचा पत्नीवर अत्याचार; पोलिसांत गुन्हा दाखल.
मित्रानेच केला मित्राचा पत्नीवर अत्याचार; पोलिसांत गुन्हा दाखल.
मित्रानेच केला मित्राचा पत्नीवर अत्याचार; पोलिसांत गुन्हा दाखल.
✒विशाल सुरवाडे, जळगाव जिल्हा प्रतिनिधी✒
जळगाव/चाळीसगाव:- जळगाव जिल्हातील चाळीसगाव मधुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चाळीसगाव येथील 22 वर्षाच्या विवाहित महिलेवर तिच्या पतीच्या मित्रानेच शारीरीक अत्याचार केल्याच्या समोर आल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. हा प्रकार 29 एप्रिल रात्रीचा सुमारास घडला असून या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त महीतीनुसार चाळीसगाव शहरातील घाट रोड या परीसरात  एक व्यक्ती आपल्या पत्नी व तीन मुलांसह राहत आहे. तो व्यक्ती भंगाराचा खरेदी विक्रीचा व्यवसाय करून आपले उदरनिर्वाह करीत असतो. मात्र 29 रोजी रात्री 8 वाजताचा सुमारास तो भांडी आणण्यासाठी बाहेर गेले असता. त्याचा मित्र निजाम शेख जकीउद्दीन मुजावर रा. कादरीनगर याने त्याच्या पत्नीला रात्री 8 वाजेच्या सुमारास फोन करून तुझे अश्‍लीत व्हिडीओ व फोटो माझ्या मोबाईलला असल्याचे सांगत याला डिलीट करायचे असेल तर पाण्याच्या टाकीच्या पाठीमागील शेतात ये असे धमकावले.
यावर संबंधीत विवाहित महिला रात्री 8.30 वाजेच्या दरम्यान सदर ठिकाणी गेली. तेव्हा निजाम शेख जकीरउध्दीन मुजावर याने मोबाईल न दाखवता तिच्यावर अत्याचार केला. तेवढ्यात तिचा पती दाखल होताच मुजावर हा तेथून पसार झाला. पिडीतेने लागलीच आपल्या पतीसह शहर पोलिस स्टेशन गाठून फिर्याद दिली. यानुसार निजाम शेख जकीउद्दीन मुजावर याच्या विरूध्द भादंवि कलम 376 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सहा पोलिस निरीक्षक एन. ए. सैय्यद हे करीत आहेत.