स्वर्ग रथ व रुग्णवाहिका निशुल्क उपलब्ध करून द्यावे; मुख्य अधिकारी यांना निवेदनाद्वारे विनोद झोडगे यांची मागणी.

47

अमोल माकोडे, ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी

ब्रम्हपुरी:- शहरात कोरोनाचा हाहाकार माजला आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अनेकांचा नेत्यांच्या नावाने चालणाऱ्या रुग्णवाहिका कोरोना या महाभयानक विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावातही जनतेची सेवा करणे सोडून सामान्य माणसांकडून १००००/- दहा हजार रुपये नागपूर करिता घेत असल्याचे कळते.हे लुटारू शाही बंद करा तुमचा जो काही भाडा असेल तोच घ्या.संकटाच्या वेळेस तरी माणुसकी जपा.हीच ब्रम्हपुरी कर म्हणून विनंती आहे.उपचारविनाना मृत्यू झाले आहे.

शहरात दिवसाकाठी चार पाच कोरोना रुग्ण दगावत आहेत.अशावेळेस मृतकाच्या परिवारास हवाली न करता परस्पर शासकीय यंत्रणेदवारे त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जाते.
कोरोनाच्या या भयानक परिस्थितीवर सामान्य माणूस बेजार झाला असून अनेक प्रकारे आर्थिक विवंचनेत असून मानसिक रित्या पूर्ण खचला आहे. ज्यांच्या कडे कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्याला नेण्यासाठी स्वर्ग रथासाठी १५०० हजार रुपये मोजावे लागते.ही बाब आजच्या परिस्थितीत अशोभनीय आहे.

शहरात जिल्ह्याचे पालक मंत्री विजय वड्डेट्टीवार यांच्या नावाने चालणारा स्वर्ग रथ आहे. एका जबाबदार खात्यांच्या मंत्री व ब्रम्हपुरी तालुक्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदार महोदय यांच्या कार्यकर्त्यांकडून कोरोना मृत व्यक्तीला नेण्यासाठी स्वर्ग रथाकरिता १५०० रुपये त्यांच्या परिवाराकडून घेतले जाते.यासारखी खेदाची बाब नाही.

महोदय ज्या परिवारातील कोरोना महामारिने निधन झाले असल्यास त्याची अंत्यसंस्कार आपण प्रशासन यंत्रणेदवारे करता असा वेळेस त्यांच्या परिवाराकडून स्वर्ग रथाचे रुपये घेऊ नये. व नगर परिषदेकडून स्वर्ग रथ निःशुल्क उपलब्ध करून द्यावा या मागणीचे निवेदन विनोद झोडगे यांनी मुख्याधिकारी नगरपरिषद ब्रम्हपुरी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.