भद्रावती मुस्लिम कमिटी तर्फे कोविड सेंटरला फ्लोमिटर आणि पीपीई कीट देऊन केली मदत.

त्रिशा राऊत, चिमूर तालुका प्रतिनिधी
चिमूर(भद्रावती):- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की,भद्रावती तालुका कोरोना प्रादुर्भावाचे हाॅटस्पाॅट झाले असून दिवसेंदिवस वाढणा-या कोरोनाच्या रुग्णांना मदत करण्याकरीता अनेक समाजसेवी संस्था पुढे येत असून भद्रावती मुस्लिम कमिटीतर्फे फ्लोमिटर व पीपीई कीट येथील जैन मंदिरातील कोविड सेंटरला मदत म्हणून देण्यात आली.

वाढत्या रुग्णसंख्येचा ताण प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेवर येत असून अनेक वस्तुंचा तुटवडा जाणवत आहे. याची जाणिव ठेवून सामाजिक बांधिलकी जपत येथील भद्रावती मुस्लिम कमिटीतर्फे महाराष्ट्र दिनी राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे प्रदेश प्रतिनिधी मुनाज शेख आणि नगरसेवक जावेद शेख यांच्या हस्ते ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. मनिष सिंग यांना फ्लोमिटर आणि पीपीई कीट सुपूर्द केले.

यावेळी भद्रावती मुस्लिम कमिटीचे सदस्य शाहिद अली, तुफेल अहेमद, एजाज आली, फय्याज शेख, रानू अहेमद, जफर अहेमद, वैद्यकीय अधिकारी डाॅ. पल्लवी सावे, रसिद बागबान, खुशबू सरकार, ज्योती वानखेडे उपस्थित होते.

यावेळी फ्लोमिटर व पीपीई कीट दिल्याबद्दल डाॅ. सिंग यांनी मुस्लिम कमिटीचे आभार मानले. तर मुनाज शेख यांनी आणखी मदत लागल्यास पुरविली जाईल असे आश्वासन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here