लसीकरण करताय.. रक्तदान का नाही??

52

लसीकरण करताय.. रक्तदान का नाही??

लसीकरण करताय.. रक्तदान का नाही??
लसीकरण करताय.. रक्तदान का नाही??

प्रा. अक्षय पेटकर प्रतिनिधी✒
हिंगणघाट :- महाराष्ट्र शासनाने शनिवार, दिनांक १ मे पासून 18 वर्षावरील नागरिकांना कोविड लसीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. व दुसरीकडे ज्या व्यक्तीने लसीकरण एकदा घेतल्यानंतर त्यांना जवळपास पंचेचाळीस दिवस तरी रक्तदान करता येत नाही. त्यामुळे राज्यात काही दिवसात ब्लड बँक मध्ये मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी लसीकरण करण्याआधी रक्तदान व शक्य असल्यास प्लाजमा दान करण्याचे आव्हान रोहित हरणे यांनी केले आहे.

बऱ्याच कोविड रुग्णांना तर रक्तामधील प्लाजमा ची मागणी मोठ्या प्रमाणात कोविड हॉस्पिटलमधून वाढलेली दिसत आहे व डोनर ची कमतरता भासत आहे. त्यामुळे जे नागरिक कोविड – १९ मधून बरे होऊन २८ दिवस पूर्ण झाले असल्यास त्यांनी प्लाजमा दान नक्की करावे. १ मे पासून शासनाच्या वतीने १८ वर्षावरील नागरिकांना लसीकरणाला सुरुवात होत आहे सरकारच्या या निर्णयाचे स्वागत देखील रोहित हरणे यांनी केले आहे.

लसीकरण करताय.. रक्तदान का नाही?

रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता
शासनाच्या वतीने 18 वर्षावरील नागरिकांना लसीकरणाला सुरुवात होत आहे तरी लसीकरणाच्या अगोदरच प्लाजमा चा व रक्ताचा तुटवडा भासत आहे तसेच तसेच लसीकरणानंतर ४५ दिवस तरी रक्तदान करता येत नाही त्यामुळे असे करण्यास अगोदरच रक्तदान करावे ही विनंती –

रोहित हरणे (जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघ जिल्हा वर्धा)