प्लाझ्मा दान करून रुग्णांचे प्राण वाचवा: नगरसेवक डॉ. नितीन उराडे यांचे आवाहन.

अमोल माकोडे, ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी
ब्रम्हपुरी:- कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे दिवसेंदिवस बाधीतांची संख्या वाढत आहे. दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात मृत्यू होत आहेत. कोरोना आजारावर प्लाझ्मा थेरपीद्वारे रुग्णांवर उपचार करुन त्यांना आधार दिला जात आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी पुढे येऊन प्लाझमा दान करण्याचे आवाहन ब्रम्हपुरी नगरपरीषदेचे नगरसेवक डॉ. नितीन उराडे यांनी केले आहे.

अनेक कोरोना रुग्णांसाठी प्लाझ्मा थेरपी ही वरदान ठरत आहे. या थेरपीमध्ये कोरोना आजारातून पुर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णाच्या रक्तातून काढलेल्या प्लाझ्मातील कोव्हिड विरोधक अँटिबाँडी दुसऱ्या रुग्णाला दिल्या जातात. त्यामुळे रुग्णांना या आजारातून बाहेर काढणे काही प्रमाणात का होईना शक्य आहे. मात्र प्लाझ्मा दान करण्यासाठी कोरोनातुन बरे झालेले रुग्ण समोर येत नाही. एका प्लाझ्मा दानातुन दोन रुग्ण बरे होऊ शकतात. त्यामुळे अधिकाधिक प्लाझ्मा दान करणे गरजेचे आहे.

त्यामुळे प्लाझ्मा डोनरने आपले प्लाझ्मा दान करुन आपले कर्तव्य बजावावे असे आवाहन ब्रम्हपुरी नगरपरीषदचे नगरसेवक डॉ. नितीन उराडे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here