आर्वी लघुशंकेला गेलेल्या कामगाराचा विद्युत प्रवाहाच्या झटक्याने मृत्यू.

55

आशीष अंबादे,वर्धा जिल्हा प्रतिनिधी ✒

वर्धा:- आर्वी विद्युत प्रवाहाचा झटका लागल्याने कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना आर्वी- पुलगाव मार्गावरील शिव ट्रेडर्स येथे रविवारी सकाळी घडली अनिल निवृत्ती कानाडे  (40) रा.आसोले नगर असे मृत झालेल्या कामगाराचे नाव आहे.पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आणि मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविला.

मृतक अनिल निवृत्ती कानाडे हा मॉडेल शालेसमोरील शिव ट्रेडर्स येथे काम करत होता. हे शिव ट्रेडर्स अब्देअली बोहरा यांनी किरायाने घेतले होते. लोकडाऊनमुळे 7 ते 11 दुकानाची वेळ असल्याने दुकान मालक बोहरा हे पहाटे अनिलला आणावयास त्याचे घरी गेले होते, असे मृतकाचे भावाने सांगितले. तेथे राहत्या झोपडीच्या बाजूला बाथरूममध्ये लघवीला गेला असताना टिनाच्या आतून इलेक्ट्रिकच्या गेलेल्या वायराला कट असल्यामुळे आणि ही वायर टिनाला टच असल्याने त्याचा हात चालू करंटच्या केबलच्या टीनाला लागून जागीच मृत्यू झाला उत्तरीय तपासणीनंतर उपजिल्हा रुग्णालयातुन मृतदेह नातेवाईकांचे स्वाधीन करण्यात आला.