राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतीदिनी शेतकरी आंदोलनाला समता सैनिक दलाचा जाहीर पाठिंबा

55

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतीदिनी शेतकरी आंदोलनाला समता सैनिक दलाचा जाहीर पाठिंबा

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतीदिनी शेतकरी आंदोलनाला समता सैनिक दलाचा जाहीर पाठिंबा
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतीदिनी शेतकरी आंदोलनाला समता सैनिक दलाचा जाहीर पाठिंबा

प्रशांत जगताप,कार्यकारी संपादक✒
वर्धा,दि.6मे:- राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतीदिनी शेतकरी कामगार आंदोलन समन्वय समिती व समता सैनिक दल यांच्या संयुक्त विद्यमाने शाहु महाराज यांच्या स्मृतींना बजाज चौक वर्धा येथे विनम्रपणे अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाच्या सुवातीला राजश्री शाहु महाराज यांच्या प्रतिमेला समता सैनिक दल जिल्हा समन्वयक गौतम देशभ्रतार व जिल्हा प्रशिक्षण अधिकारी मधुर येसनकर यांच्या हस्ते माल्यार्पण करून मानवंदना देण्यात आली.

केंद्र शासनाने मंजूर केलेले शेतकरी विरोधी कायदे रद्द करावे या मागणीसह दिल्लीतील शेतकरी
आंदोलनाला पाठींबा देण्याकरिता बजाज चौकात मागील १४३ दिवसांपासून शेतकरी, कामगार समन्वय समीतीच्या नेतृत्वात शेतकरी आंदोलन सुरू आहे. दिल्ली नंतर देशात सर्वात जास्त काळ सुरू राहिलेले हे दुसरे शेतकरी आंदोलन आहे.मात्र काही दिवसांपूर्वी नगरपालिकेने दडपशाही दाखवित शेतकरी आंदोलनाचा मंडप काढून टाकला. परंतु कार्यकर्त्यांनी हताश न होता फुटपाथवर आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार केला.

सदर आंदोलन अखंडित सुरू रहावे याकरिता समता सैनिक दल वर्धा जिल्हा युनिटच्या वतीने राजर्षी शाहु महाराज यांच्या स्मृतीदिनी पाठिंबा जाहीर करण्यात आला तसेच या आंदोलनाच्या पुढील लढाई करीता समता सैनिक दल सदोदित आपल्या पाठिशी खंबीरपणे उभे राहील असे जिल्हा समन्वयक गौतमभाऊ देशभ्रतार यांनी शेतकरी आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांना आश्वस्त केले.

यावेळी समता सैनिक दल जिल्हा सह-संघटक अविनाश गायकवाड,अविनाश सोमनाथे,संजय जवादे, रामजी शुक्ला,समता सैनिक दल जिल्हा संरक्षण विभाग प्रमुख प्रदीप कांबळे, जिल्हा प्रशिक्षक मधुर येसनकर, तालुका संघटक मनोज थूल, डॉ. प्रमोद टाले, बाबाराव गावंडे, श्रीया गोडे, अवधेश भाई, शरद हलगे, दामोदर उघडे, मराठा महासंघाचे दिपक कदम, सुरज मून, गजानन पखाले आदी समता सैनिक दल व शेतकरी आंदोलनातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.