अमित चौधरी मृतकाच्या परिवाराला वंचित बहुजन आघाडीच्या सहकार्याने मिळाली आर्थिक मदत.

✒युवराज मेश्राम, नागपुर जिल्हा प्रतिनिधी✒
नागपुर,दि.7 मे:- 6 मे ला नागपूर अमरावती रोडवरील लाजीस्टिक पार्क या कंपनीत 4 दिवस अगोदर मुंबईतील निडो कंपनीने मेकॅनिकल इंजिनियर अमित संतोष चौधरी या तरुणला मशीन रिपेअर करायला पाठवले होते, पण काल दिनांक 6 तारखेला मशीन रिपेअर करत असताना मशीन मध्ये फसून मरण पावला ही घटना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव प्रमोदभाऊ बागडे यांना माहीत मिळतच तातडीने ग्रामीण रुग्णालय कळमेश्वर येथे भेट देऊन परिवाराची चर्चा केली व कंपनी व्यवस्थापक यांच्याशी संपर्क करून मृतकाच्या परिवाराला काय मदत करणार आहात. तेव्हा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पळवा पळवीचे उत्तर दिले म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी कंपनी समोर मृतक अमित चौधरीचे पार्थिव ठेवून आंदोलन करण्याचे ठरविले होते. ही गोष्ट पोलीस स्टेशन व कंपनीला माहिती मिळाली तेव्हा त्यांनी तर त्यांनी पोलीस ठाण्यात दोन्ही कंपनीच्या अधिका-यायांना बोलावून मृतकाचे परिवार व वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारीशी चर्चा करून मृतक अमित चौधरीच्या परिवाला 14 लाख रुपयांची मदत देण्याचे आश्वासन दिले व तात्काळ निडो कम्पनी ने 20 हजार रुपये अंतिम संस्कार करणासाठी मदत दिली. त्यानंतरच मृतकाचे पार्थिव त्याचा गावाला रवाना केले या प्रसंगी बैठकीचे नेतृत्व जिल्हा महासचिव प्रमोदभाऊ बागडे यांनी केले तर प्रमुख उपस्थिती म्हणून राजेश भाऊ जंगले, जिल्हा सचिव उमरावजी लाखे, मधूकरव बागडे, गणपतराव हातेकर, अमोल भाऊ डोंगरवार, मनिष शेंडे, रणजित ढोले, सचिन बागडे, दिलीपभाऊ बनसोड, नामदेवजी बागडे व अनेक वंचीत बहुजन आघाडी चे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.