यवतमाळ जिल्हात कडक लॉकडाउन..

✒साहिल महाजन, यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी✒
यवतमाळ 8 मे:- जिल्ह्यांमध्ये कोरोना वायरसचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील स्थानिक प्रशासनाने जिल्ह्यामध्ये संपूर्ण कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे. कोरोना संसर्ग प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवीन कडक निर्बंध केले जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जाहीर केले आहेत. 9 मे च्या सकाळी 7 वाजता पासून 15 मे च्या सकाळी 7 पर्यंत कडक निर्बंध जाहीर करण्यात आले आहेत. या काळात अत्यावश्यक सेवेचे कार्यालय वगळता सर्व खासगी शासकीय निमशासकीय कार्यालये बंद राहतील. 25 लोकांना उपस्थित मध्ये लग्न परवानगी, मात्र तशी परवानगी तहसीलदार यांच्या कडून घेणे आवश्यक असेल.