भंडारा जिल्हा परिषदच्या कँन्टीन मध्ये शिव भोजन मध्ये दिल्या जात आहे अळ्यायुक्त जेवन.

✒आशीष अंबादे, प्रतिनिधी ✒
भंडारा:– जिल्हा परिषद कॅन्टीन मध्ये सरकार मार्फत चालविल्या जात असलेल्या शिवभोजन थाळीत देण्यात येणाऱ्या जेवणाचा दर्जा हा अतिशय निकृष्ट असल्याच्या तक्रारी जनतेकडून वारंवार येत आहेत. लॉकडाऊनच्या काळात अख्ख्या महाराष्ट्रात शिवभोजन थाळी ही गरिबांसाठी संजीवनी ठरली आहे; भंडाऱ्यात मात्र हीच शिवभोजन थाळी नागरिकांच्या आरोग्याला मारक ठरत आहे.
जनतेच्याच पैशातून सरकार मार्फत शिवभोजनाची ही योजना राबविली जात आहे. सरकार एका थाळीसाठी कंत्राटदाराला चाळीस रुपये देते. चाळीस रुपयात खाजगी मेस वाले पोट भरेल असा भरपूर टिफीन देतात; मात्र, शिवभोजनाच्या नावाखाली चालविल्या जात असलेल्या या थाळीत अतिशय निकृष्ट दर्जाचे अगदी तटपुंजे नाष्टा ही होणार नाही असे नाममात्र जेवण दिले जात आहे. जेवणात कधी कधी एकच पोळी दिली जाते. तर कधी कधी पोळी नाही; भात खायचा असेल तर खा नाहीतर परत जा आणि ज्याची प्लेट त्याला धुवावी लागेल असे कंत्रादाराकडून बोलण्यात येते. जेवणात अनेकवेळा अळ्या निघत असल्याच्या तक्रारी लाभार्थ्यांकडून करण्यात येत आहेत मात्र भंडारा जिल्हा प्रशासनाला याकडे लक्ष द्यायला वेळ नाही.
भंडारा जिल्हा परिषद कॅन्टीन मधील शिवभोजनालयाचे कंत्राट तत्काळ रद्द करण्यात यावे; अन्यथा नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारे जिल्ह्यात अशाप्रकारचे एकही भोजनालय आम्ही चालू देणार नाही असा इशारा रिपब्लिकन पँथर संघटनेचे जिल्हाध्यक्ष माधवराव नारनवरे यांनी जिल्हा प्रशासनाला दिला आहे.
गुरुवारी सकाळी मी भंडारा जिल्हा परिषद कॅन्टीन मध्ये शिवभोजन करत असताना मला माझ्या थाळीत अक्षरशः अळ्या दिसल्या. मी कंत्राटदाराला जाब विचारला असता जेवायचं असेल जेवा नाहीतर निघून जा असे ते बोलले. जिल्हा परिषद कॅन्टीन मध्ये लाभार्थ्यांना स्वतःच्या प्लेट स्वतःच धुवायला सांगतात. जेवणात एकच पोळी देतात कधी कधी तर पोळी नाही आहे भात खायचा असेल तर खा नाहीतर परत जा असे सांगितले जाते. बाहेर 40 रुपयात पोटभर जेवण मिळत असताना शासनाच्या या योजनेत 40 रुपयात अगदी तटपूंजे आणि अतिशय निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत आहे. हा गरिब जनतेच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार आहे. भंडारा प्रशासनाने याकडे लक्ष द्यायला हवे.
लाभार्थी- विशाल उकरे, गणेशपूर