वैद्यकीय शिक्षण घेनारे ही झाले कोरोंना योद्धा.

24

वैद्यकीय शिक्षण घेनारे ही झाले कोरोंना योद्धा.

वैद्यकीय शिक्षण घेनारे ही झाले कोरोंना योद्धा.
वैद्यकीय शिक्षण घेनारे ही झाले कोरोंना योद्धा.

मुकेश चौधरी, विदर्भ ब्युरो चीफ✒
हिंगणघाट,दि.9मे:- वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी अश्या संकट वेळी प्रशासनास आपली सेवा देण्यात यावी, या शासनाच्या धोरणामुळे वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी देखील आता कोरोना योद्धा झाले आहेत.

कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेमुळे संक्रमिताच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. या बाधितांना आवश्यक वैद्यकीय सुविधा कमी पडू लागल्या. त्यासोबत संक्रमित लोकांवर उपचार करणाऱ्या कर्मरचार्या ची देखील उणीव भासू लागली. अचानक उद्भवलेल्या या दुसऱ्या लाटेमुळे प्रशासनावर मोठे दडपण आले. तेव्हां प्रशासनाने सामाजिक संस्था, व दानशूर लोकां कडून वैद्यकीय सुविधा मिळविल्या. वैद्यकिय सुविधा तर मिळाल्या पण त्याचा वापर करण्या साठी मनुष्य बळ कमी पडत होते.

या पार्श्वभूमी वर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सेवा देण्याचे आव्हान करण्यात आले. याला चांगला प्रतिसाद मिळून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त पणे पुढे येऊन कोणताही मोबदला न घेता आपली सेवा देत आहे. शहरातील ज्येष्ठ पत्रकार दशरथ ढोकपांडे यांची मुलगी रचना हिने देखील कोरोना लढ्यात आपला सहभाग नोदविला. अरिहंत औषधी दुकानात कोणताही मोबदला न घेता ती आपली सेवा देत आहे.

बोरगाव मेघे येथील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासिटिकल एज्युकेशन अंड रिसर्च मध्ये ती चवथ्या वर्षाला शिकत आहे. या कोरोना लढ्यात आपलेही योगदान असावे या उद्देशाने तिने उचलले हे धाडसी पाऊल सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरत आहे.