बोगस बियाणे -खत- कीटकनाशके विक्रेत्यांवर आळा घाला; अन्नदाता एकता मंच चे कृषी मंत्र्याला निवेदन

58

बोगस बियाणे -खत- कीटकनाशके विक्रेत्यांवर आळा घाला; अन्नदाता एकता मंच चे कृषी मंत्र्याला निवेदन.

बोगस बियाणे -खत- कीटकनाशके विक्रेत्यांवर आळा घाला; अन्नदाता एकता मंच चे कृषी मंत्र्याला निवेदन.
बोगस बियाणे -खत- कीटकनाशके विक्रेत्यांवर आळा घाला; अन्नदाता एकता मंच चे कृषी मंत्र्याला निवेदन.

त्रिशा राऊत, चिमूर तालुका प्रतिनिधी
चिमूर (भद्रावती ):- शेतीच्या नवीन हंगामाला सुरुवात होत आहे.बियाणे खरेदीला आता वेग येताच बाजारात बोगस बियाणांची मोठ्या प्रमाणात विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक केली जातात. असाच प्रकार मागील वर्षी झाल्याने बोगस बियानांमुळे शेतकरयांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागले त्यामुळे बोगस कृषी केंद्र विक्रे त्यावर कारवाही करण्याची मागणी अन्नदाता एकता मंच मे निवेदना द्वारे कृषी मंत्र्याकडे केली.

संचारबंदीचा फायदा घेत बोगस सोयाबीन आणि कापूस बियाणांची गत वर्षी विक्री करण्यात आली, त्यामुळे सोयाबीन उगवलेच नाही तर कापूस पिकांवर रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला. तसेच बियाणांचा तुटवडा असल्याचे कारण देत जास्त दरात बियाणे विकण्यात आले त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. तसाचे प्रकार या वर्षी सुद्धा होव् नये यासाठी चंद्रपूर जिल्ह्याला तेलंगणाची सीमा लागलेली असल्यामुळे तिथून मोठ्या प्रमाणात बोगस बियाणे महाराष्ट्रात येतात त्याचेवर आळा घालण्यात यावा. तरच बोगस बी बीयानावर अंकूश बसेल तसेच कीटकनाशकांची किंमत फिक्स करून शेतकऱ्यांना वाजवी दारात उपलब्ध करून देण्यात यावी.

संपूर्ण महाराष्ट्रात आणि विशेष चंद्रपूर जिल्ह्यात विशेष पथक स्थापन करून धडक मोहीम राबवून कडक कारवाही करण्यात यावी.तसेच बियाणे, खते आणि कीटकनाशके चढ्या दराने विक्री करणाऱ्या कृषी केंद्रावर कारवाही करण्यात यावी. असे निवेदन संदिप अण्णाजी कुटेमाटे अध्यक्ष अन्नदाता एकता मंच . इंजि.अनुप सुधाकर कुटेमाटे संस्थापक अन्नदाता एकता मंच तालुका भद्रावती यांचे कडून दादाजी भुसे कृषीमंत्री महाराष्ट्र, उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री, दिलीप वळसे पाटील गृहमंत्री, विजयभाऊ वडेट्टीवार पालकमंत्री चंद्रपूर, जिल्हाधिकारी चंद्रपूर, कृषी अधीक्षक चंद्रपूर, पोलिस अधीक्षक चंद्रपूर यांना निवेदन देण्यात आले आहे.