जि. प. चे समाजकल्याण सभापती नागराज गेडाम यांनी घेतली कोरोना लस.

मुकेश शेंडे, सिंदेवाही तालुका प्रतिनिधी
सिंदेवाही दि.09 मे:- सविस्तर वृत्तअसे आहे की, कोरोना प्रतिबंधात्मक लस ही पूर्णपणे सुरक्षित असल्याने आज सिंदेवाही येथिल सर्वोदय कन्या विद्यालयाच्या लसीकरण कक्षात जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती श्री. नागराज गेडाम यांनी लस टोचून घेतली.
यावेळी त्यांसमवेत, जि. प. सदस्य तथा भाजपचे महामंत्री संजय गजपूरे व पं. स. सदस्य रितेश अलमस्त उपस्थित होते.
कोरोना प्रतिबंधात्मक लस ही पूर्णपणे सुरक्षित असल्याने सिंदेवाही तालुकावासीयांसह जिल्ह्यातील समस्त जनतेला माझी विनंती राहील की, 18 – 44 वयोगटातील सर्वांनी ज्यांची नोंदणी झाली आहे त्यांनी आणि इतरांनीही लवकरात लवकर आपली नोंदणी करून घेऊन जवळच्या लसीकरण केंद्रात जावून जरूर लस टोचून घ्यावी. असे प्रतिपादन यावेळी सभापती गेडाम यांनी केले.