समाजकार्यासाठी वामनराव दांडगे भीम आर्मीत दाखल.

✒️संतोष म्हस्के, जालना जिल्हा प्रतिनिधी✒️
जालना:- जिल्हा कोषागार कार्यालय, जालना येथे कार्यरत असलेले वामनराव काळूबा दांडगे (नाईक) हे दि.30एप्रिल रोजी 34 वर्षे अखंडीत सेवा करून सेवानिवृत्त झालेले आहेत. त्या निमित्ताने भीम आर्मी जिल्हा जालना तर्फे त्याचा शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.
महाराष्ट प्रदेश संघटक रंजित माने, भीम आर्मी जिल्हा अध्यक्ष सुभाष दांडेकर, भीम आर्मी जिल्हा सल्लागार एम. यू पठाण, भीम आर्मी जिल्हा मार्गदर्शक ए के. पगारे, महाराष्ट्र भटक्या जाती जमातीचे अध्यक्ष हर्षकुमार गायकवाड, भीम आर्मी जिल्हा जेष्ठ कार्यकर्ते परमेश्वर मोरे, अशोक पाडमुख, पोलीस हवालदार संजय अजगर, बी.आर.गाडेकर सह अनेक कार्यकर्ते हजर होते.
रंजित माने यांनी आपले भाषनात दांडगे याचे पुढील आयुष्य सुख समृद्धी जावो असे नमूद करून त्याचा कार्यचा गौरव केला. तर भीम आर्मी जिल्हा अध्यक्ष सुभाष दांडेकर यांनी दांडगे यांना शुभेच्छा दिल्या. समाजासाठीे आपण काही तरी करावे, म्हणून दांडगे यांनी भीम आर्मी मधे प्रवेश केला. या पुढील उर्वरित आयुष्य समाज सेवेसाठी खरचं करायाचे असे त्यानी मत व्यक्त केले. यावेळी अनेकांनी दांडगे यांना शुभेच्छा शुभेच्छा दिल्या.