डोंबिवलीत मंगळवारी वीज पुरवठा होणार खंडीत.

✒नीलम खरात, मुंबई प्रतिनिधी✒
डोंबिवली,दि10 मे:- मुंबईच्या उपनगर डोंबिवलीत मंगळवारी विज वाहक यंत्राची देखभाल – दुरुस्ती तसेच पावसाळाच्या पुर्वी त्याची योग्य रिपेरिंग करणाच्या कामांसाठी डोंबिवलीतील काही भागांचा वीजपुरवठा मंगळवारी काही तासांसाठी खंडीत केल्या जाईल अशी माहिती विज महावितरण मंडळाकडून देण्यात आली आहे. याबाबत वीज ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईलवर यासंदर्भात संदेश पाठवण्यात आले असून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात विजेचा लपंनडाव सुरु होतो. रोहित्र व या रोहित्रांवरील उच्च व लघुदाब वाहिन्या स्थलांतरित करावयाच्या आहेत. याशिवाय पावसाळ्यातील संभाव्य बिघाड टाळण्यासाठी वृक्षाच्या फांद्या छाटणे, वेली दूर करणे, रिपेरिंग, नटबोल्ट बदलणे, जीओडी मेंटेनन्स आदी देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी वीजपुरवठा खंडीत केला जाणार आहे.