चंद्रपुरात आमदार निधी व CSR मधून साकारले 100 बेडचे ऑक्सिजनयुक्त कोविड रुग्णालय.

✒मनोज खोब्रागडे✒
पूर्व विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
चंद्रपूर :- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की, सोमवारपासून रुग्णसेवेसाठी होणार सज्ज,आमदार स्थानिक विकास निधीतील एक कोटी रुपये तसेच उदयोगांच्या सामजिक दायित्व निधीतून वन अकादमी, चंद्रपूर येथे साकारण्यात आलेले 115 खाटांचे कोविड रुग्णालय सोमवार पासून रुग्णांना आरोग्यसेवा देण्यासाठी सज्ज होणार आहे. आज रविवारी या रुग्णालयाच्या अंतिम टप्यात असलेल्या कामाची पाहाणी केली असून येथून रुग्णांना उत्तम आरोग्य सेवा मिळाव्या अशा सूचना केल्या आहे. येथील रुग्णांवर सीसीटीव्हीच्या निगराणीत रुग्णांवर उपचार करण्यात येतील, रुग्णांच्या प्रकृती बाबतची माहिती नातलगांना देण्यात येईल, तसेच इथे उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातलगांच्या जेवणाची व्यवस्थाही रुग्णालया मार्फत करण्यात येणार आहे. पाहणी दरम्याम नोडल ऑफिसर रोहन घुगे, बांधकाम विभागाचे अभियंता रोठोड यांच्यासह माजी नगर सेवक बलराम डोडाणी, अजय जयस्वाल तसेच रुग्णालयीन सर्व कर्मचारी यांची उपस्थिती होती.