विरुर स्टेशन परिसरात जनावरांची मोठ्या प्रमाणात तस्करी.
विरुर पोलीस प्रशासनाचा आशीर्वाद की दुर्लक्ष यात मात्र प्रश्नचिन्ह

तिरूपति नल्लाला
राजुरा, विरूर ग्रामीण प्रतिनिधि
विरुर स्टेशन:- सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे आहे की गेल्या काही महिन्या पासून जनावरांची तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे अशी माहिती आम्हच्या प्रतिनिधीला कळल्यावर आम्हच्या प्रतिनिधी ने सातत्याने पाठपुरावा व पाळत ठेवून होते आणि याचा पाठपुरावा करतांना असे आढळून आले की,राजुरा तालुक्यातील विरुर स्टेशन परिसरातून खुप मोठ्या प्रमाणात जनावारांची तश्करी होत असून पोलीस निरीक्षक व पोलीस प्रशासनाचे कुठलेच लक्ष नाही. असे आढळून आले आहे.
काही सूत्रा द्वारे माहिती मिडली की छत्तीसगढ़ वरून मूल मार्गे दरजोर रात्रो 25 ते 30 मोठ्या गाड्या भरून जनावारे तेलंगाना ला पाठवाली जाते आणि या पूर्ण गाड्या विरुर पोलीस स्टेशन वरून जात असताना देखील विरुर पोलीसना हे कानाडोळा का करत आहेत यात शंका निर्माण झाली आहे. आणि जर या जनावरांच्या तस्करी बद्दल चागल्या प्रकारे माहिती असूनही कानाडोळा करत असेल आणि विरुर पोलीस स्टेशन चे ठानेदार मा. तिवारी साहेब कुठालीच कारवाही करत नाही.यावरून असे समजून येते की स्वतः ठानेदार साहेबाने या कामा साठी परवानगी दिली की काय असा प्रश्न येथील जनतेला पडला आहे.
आमच्या या श्रीराम भूमि वर ज्या जनावारांची पूजा अर्चना केली जाते त्या भूमिवर या गाई गुरांच सरेआम कत्ल होत आहे तरी पन पोलीस प्रशासन का लक्ष्य नाही यावर सर्वत्र संशय व्यक्त होत आहे. आणि जर लवकरात लवकर या जनावरांच्या तस्करी करणाऱ्या वर कारवाई करण्यात आली नाही तर कित्येक जनावरांची कत्तल होईल यात काही शंका नाही म्हणून येथील जनतेत हळहळ व्यक्त केली जात आहे.