कोरोनाबाधित रुग्ण फिरतोय रस्त्यावर ग्रामीण भागातील आपत्ती व्यवस्थापन समित्या कुचकामी.

47

कोरोनाबाधित रुग्ण फिरतोय रस्त्यावर ग्रामीण भागातील आपत्ती व्यवस्थापन समित्या कुचकामी.
तलाठी व ग्रामसेवक जिल्याच्या ठिकाणाहून करतोय अपडाऊन.

कोरोनाबाधित रुग्ण फिरतोय रस्त्यावर ग्रामीण भागातील आपत्ती व्यवस्थापन समित्या कुचकामी.
कोरोनाबाधित रुग्ण फिरतोय रस्त्यावर ग्रामीण भागातील आपत्ती व्यवस्थापन समित्या कुचकामी.

✒️साहिल महाजन यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी✒️
यवतमाळ,दि.11 मे:- यवतमाळ जिल्हा मोठ्या प्रमाणात कोरोना वायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे. रॅपिड किंवा आरटीपीसीआर चाचणीमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या गृहविलगीकरणासाठी सोयी उपलब्ध करून देण्यात आली आहे परंतु, बहुतांश गृहविलगीकरणातील कोरोना बाधित रुग्ण रस्त्यावर फिरत असल्याने कोरोना संसर्गाचा धोका अधिक वाढत आहे. ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांना गृहविलगीकरण जाते मात्र. स्वतंत्र खोली, स्वतंत्र शौचालय, स्वतंत्र स्नानगृह असावे मात्र अशा प्रकारची सुविधा ग्रामीण भागात कित्येकांनकडे नसते. त्यामुळे घरातील व्यक्ती बाधित व्यक्तीकडून संसर्गित होत असल्याचे समोर येत आहे. 

दोन किंवा तीन खोल्यात संसार करणारे बाधित व्यक्ती खऱ्याअर्थाने गृहविलगीकरणाचे निकष पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे घरच्या घरी संसर्गाचा धोका वाढत आहे. तसेच शेजाऱ्यांनाही धोका पत्कारावा लागत आहे. काही गावांत कोरोनाबाधितांची घरे मायक्रो कॉन्टेनमेंट झोन म्हणून स्थानिक ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्या वतीने घोषित केले जात नाही. घरच्या भिंत्तीवर स्टिकर लावली जात नाहीत. त्यामुळे सदर कुटुंबातील सदस्य कोरोनाबाधित आहेत, हेच  शेजाऱ्यांना माहिती नसते. त्यामुळे शेजारीदेखील संसर्गित व्यक्तीच्या संपर्कात येतो. परिणामी बाधितांची संख्या शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातही वाढत आहे.

आपत्ती व्यवस्थापण समिती कुचकामी 

ग्रामपंचायत स्तरावर कार्य समित्याचे गठन केले आहे प्रत्येकी गावातील शाळा विलगीकरणासाठी उपलब्ध करून दिल्या आहे. मात्र यांची अमंलबजावणी होत. नसल्यामुळे कोरोना बाधितांच्या गृहविलगीकरणाची व्यवस्था असो की नसो घरीच विलगीकरणात राहत आहे.  त्यामुळे जिल्हाधिकारी यांचा ब्रेक द चेन चा आदेश फोल ठरत आहे.