शिक्षकानी केलेल्या शिष्यवृत्ती परीक्षा रद्द करण्यासाठी शिक्षक परिषदेचा पाठपुरावा ठरला यशस्वी.
शिक्षकानी केलेल्या शिष्यवृत्ती परीक्षा रद्द करण्यासाठी शिक्षक परिषदेचा पाठपुरावा ठरला यशस्वी.

शिक्षकानी केलेल्या शिष्यवृत्ती परीक्षा रद्द करण्यासाठी शिक्षक परिषदेचा पाठपुरावा ठरला यशस्वी.

आता शिष्यवृत्ती परिक्षेला स्थगित

शिक्षकानी केलेल्या शिष्यवृत्ती परीक्षा रद्द करण्यासाठी शिक्षक परिषदेचा पाठपुरावा ठरला यशस्वी.
शिक्षकानी केलेल्या शिष्यवृत्ती परीक्षा रद्द करण्यासाठी शिक्षक परिषदेचा पाठपुरावा ठरला यशस्वी.

त्रिशा राऊत, चिमूर तालुका प्रतिनिधी
चिमूर (भद्रावती):- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की,महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा शेवट पर्यंत पाठपुरावा कामी आला. शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली. मंत्रालयात शिक्षक परिषद ने दिलेली निवेदने १० वी परीक्षा बाबतीत पत्रव्यवहार सुरू होता तेव्हा पासूनच आपली मागणी.‌‌ शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात यावी हा निर्णय अगोदरच होणे अपेक्षित होते, पण परीक्षा परीषदेने लोक मताचा आदर न करता विषय ताणून धरला, त्यामुळे बहिष्काराचा इशारा द्यावा लागला. त्यानंतरही तोंडी आदेश येत, लेखी पत्र नाही त्यामुळे संभ्रम कायम होता.. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने ४ स्वतंत्र पत्र लिहून तसेच त्याअगोदर ही संयुक्त पत्र लिहून विषय सुरू ठेवला, परिक्षा परिषदेने २८ एप्रिल पर्यंत व त्या नंतर ही परीक्षा होणारच अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे संताप व्यक्त होत होता. शिक्षक परिषद ने सांगितले देशातील सर्व प्रमुख परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या, आता तरी‌ निर्णय घ्या पण सरकारी हट्टवाद सुरूच होता. मग आपण बहिष्कार टाकण्याचा मार्ग स्वीकारत असल्याचे कळवले. मग सरकारी यंत्रणा जागी झाली. आपला सतत पाठपुरावा आणि वर्तमान पत्रांनी, माध्यमांनी राज्यभर घेतलेली दखल यामुळे सरकारी यंत्रणा जागी झाली.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद ने बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला जो पर्यंत अधिकृत परिपत्रक येत नाही लढाई सुरू राहिल, कालच नागपूर विभागाचे शिक्षक आमदार नागो गाणार यांनी शासन विद्यार्थ्याच्या जीविताशी खेळुन, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा घडण्याची वाट बघत आहे का? अशा प्रकारचा निर्वाणीचा इशारा शासनाला दिला. निर्णय लवकर होणे आवश्यक होते कारण विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पालक अडकून पडले होते. सेंटर असणा-या शाळा सतत संपर्क करत होत्या, आंनलाईन शिष्यवृत्तीचे वर्ग सुरू असणारे शिक्षक पालक सतत विचारत होते, त्यांच्या सतत च्या मागणी मुळे विषय लावून धरला शेवटी सर्वांचे आरोग्य महत्वाचे होते.त्यामुळे विषय महत्वाचा होता. शेवटी महाराष्ट्र परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनीशिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात येत असल्याचा आदेश काढला. ” देर आये दुरुस्त आये”. यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद नागपूर विभाग कार्यवाह योगेश बन, नरेश कामडे, के.के बाजपेयी, सुनील पाटील, रंजना कावळे, अजय वानखेडे, विनोद पांढरे, राधेशाम पंचबुद्धे, सुधीर अनवाने, राजेंद्र पटले, सुधीर वारकर, अशोक हजारे, सुरेश रोठे, रामदास गिरटकर, गोपाल मुनघाटे,बीसेन सर, पुंडलिक नाकाडे,मनीषा कोलरकर, सुभाष गोतमारे, प्रवीण भोयर, अंगेश बेहलपांडे, मधुकर मुपद्दीवार, गुणेश्वर पुंडे, संतोष सुरावार, दिवाकर पुद्दतवार, विलास बोबडे, जुगलकिशोर बोरकर, प्रकाश चुणारकर, विजय साळवे, प्रमोद खांडेकर, अविनाश ताळापल्लीवार, अमोल देठे, मोरेशवर गौरकर यांनी पाठ पुरावा केला. आणि त्या पाठपुराव्याला यश ही आले याचं त्यांना समाधान व्यक्त केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here